पुणे : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल

Featured पुणे
Share This:

पुणे : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल

 

पुणे  (तेज समाचार डेस्क) : घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी विवाहितेने पोलिसात धाव घेत पती व सासूच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला. पती भार्गव महेश अय्यर, सासू भारती महेश अय्यर (दोघे रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासूने फिर्यादी विवाहीतेसोबत वारंवार शिवीगाळ करून भांडणे केली. मुलगा भार्गव याला सासूने विवाहितेच्या विरोधात भडकावले. त्यामुळे आरोपी भार्गव याने देखील विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. ‘तू मारून जा’ असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *