
पुणे : ‘या’ पुलावरुन प्रवास करणं टाळा!
पुणे : ‘या’ पुलावरुन प्रवास करणं टाळा!
पुणे (तेज समाचार डेस्क) : खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 16 हजार 478 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं असून यामुळे भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे. यामुळे खडकवासला भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडीही कोसळू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ जोरदार बँटिग सुरू केली.