पुणे: प्राधिकरणात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क): निगडी प्राधिकरण येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. डॅनियल राज मार्थदन (वय 21, रा. प्राधिकरण, निगडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॅनियल याने स्वतःला सोमवारी सकाळी 10 वाजता त्याच्या खोलीत बंद करून घेतले. दुपारी दोन वाजता घरचे त्याला जेवणासाठी बोलवायला गेले, मात्र डॅनियल याने दरवाजा उघडला नाही.डॅनियल दरवाजा उघडत नसल्यामुळे घरचे घाबरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला असता डॅनियल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने खिडकीच्या पडद्याच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

डॅनियलच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. डॅनियल शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *