पुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी

Featured पुणे
Share This:

पुणे : 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी

पुणे  (तेज समाचार डेस्क): गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. काल रूग्णसंख्या घटल्यानंतर आज परत एकदा नव्याने नोंद झालेली संख्या वाढलेली दिसून येत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 271 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज 359 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 271 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 6472 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2376 एवढी आहे. तर आज दिवसरात 138 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 06 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात 173 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 42 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *