आदिवासी कोळी समाज वधूवर पालक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन

धुळे
Share This:

आदिवासी कोळी समाज वधूवर पालक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन

शिंदखेडा (तेज समाचार डेस्क):  शिंदखेडा तालुक्यातील आशापुरी देवी, पाटण येथे धुळे, नंदुरबार,जळगाव आदिवासी कोळी समाज वधूवर सुचक मंडळाच्या पहिला वधूवर पालक परिचय मेळाव्याच्या पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण बागुल, प्रमुख पाहुणे सुनिल सौदाणे (तहसीलदार शिंदखेडा), शानाभाऊ सोनवणे, ॲड्, अनिल नन्नावरे, प्रभाकर सोनवणे, सुरेश कुवर, चतुर देवरे, मनोज निकम, कल्पना बोरसे,सोनाली आखडमल, गितांजली कोळी, शोभाताई खैरनार, शोभा ठाकरे, वैशाली महाले, धनराज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने वधूवर पालक परिचय मेळावा घेण्याची परवानगी नाकारली त्यामुळे सुचक मंडळाने फक्त पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आगामी काळात सामूहिक विवाह किंवा मेळावा घेण्यात येईल असे रविभाऊ सिरसाठ यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सोनवणे यांनी केले, गितांजली कोळी, कल्पना बोरसे,तहसीलदार सुनिल सौदाणे, मनोज निकम, अनिलदादा नन्नावरे, चतुर देवरेसाहेब, प्रभाकर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास ईशी व आभार प्रकाश सोनवणे यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वधू वर सुचक मंडळाचे रविभाऊ सिरसाठ, संदिप येळवे,हिराभाऊ वाकडे, निलेश पवार,प्रा.आप्पा कोळी, मयूर सोनवणे, अमोल निकुमे, महेंद्र कोळी, ज्ञानेश्वर कोळी, दिलीप सिरसाठ, डाॅ.सुरेश कोळी, पवन बागुल, सतिष ईशी, प्रकाश सोनवणे, कैलास ईशी, दत्ता चव्हाण, संदिप चव्हाण, अर्जुन सिरसाठ, चेतन पवार, राकेश कुवर,अविनाश शिंदे,निलेश श्रीराव,दिपक शिरसाठ, महेंद्र दावळे, राकेश चव्हाण, राहुल ईशी, दिलीप सांळुखे, कृष्णा कोळी, यांनी परिश्रम घेतले

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *