चुंचाळे-बोराळे गांवातील महिलांच्या सार्वजनिक शौच्छालयात आणि गांवातील पथदिवे बंद

Featured जळगाव
Share This:

बंद दिवे तात्काळ सुरू करणेची भिम आर्मी ची मागणी.

यावल  (सुरेश पाटील) तालुक्यातील चुंचाळे बोराळे येथील बऱ्याच दिवसा पासून महिलांच्या शौचालयातील तसेच अनेक भागातील पथदिवे व हायमास्ट बंद पडलेले ते पथदिवे ग्रामपंचायतीने तात्काळ सुरू करणेची मागणी भिम आर्मीचे जिल्हा सचिव सुपडु संदानशिव यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीने पथदिवे बसविलेले आहेत परंतु दिवाबत्ती सुरु करण्याकडे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामसेवकांचे दुर्लक्ष आहे, तसेच चुंचाळे व बोराळे मध्ये खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमाँस्ट पोल बसवीण्यात आले आहे मात्र त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भिम आर्मीचे जिल्हा सचिव सुपडु संदानशिव यांनी सांगितले आहे. गांवासह परिसरात संद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या आठ दिवसापासून सततधार पाऊस सुरु आहे.

हायमास्ट पोल व गांवातील खांबावरील पथदिवे हे बंद असल्याने महिला व लहानमुलाना सरपटणाऱ्या प्राण्यापासून धोका निर्माण होऊ शकतो व प्रसगी आपला जिव देखील गमवावा लागु शकतो तरी गांवातील पथदिवे व हायमाँस्ट लॅम्प त्वरीत सुरु करण्यात यावे व नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ कुठेतरी थांबवावा असे ते म्हणाले आहे गांवात लाखो रुपये खर्च करुन महिलांसाठी सार्वजनिक शौच्छालय बांधण्यात आलेले आहेत,त्यांना एक वर्ष उलटून देखील तेथे लाईट आलेली नाही किव्वा तेथे देखील पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत तरी लवकरात लवकर ग्रामपंचायती मार्फत महिलांचे सार्वजनिक शौचालयासाठी पथदिवे बसविण्यात यावेत व गांवातील पथदिवे व हायमास्ट लवकर दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी भिम आर्मी ने केलेली आहे.

महिलांचे सार्वजनिक शौचालयात पथदिवे बसविण्यात आले तर महिला रात्री शौचालयाचा वापर करतील लाईट न बसवल्यामुळे महिलांना रस्त्यावर प्रात विधीस बसावे लागत आहे त्यामुळे गांवात रोगराई पसरत आहे पुढे चालत मोठ्या प्रमाणात गांवात रोगराई पसरू शकते आणि मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. आणि यासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत जबाबदार राहील, त्यामुळे तेथे तात्काळ पथदिवे बसविण्यात आले पाहिजे नाही तर भिम आर्मी संविधानिक मार्गाने आंदोलन करेल असे भिम आर्मी भारत एकता मिशनचे जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी सांगितले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *