लोकसहभागा तुन चोपड़ात ऑक्सिजन प्रकल्प

Featured इतर जळगाव
Share This:

चोपडा येथील लोकसहभागाची चळवळ ही फक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाही तर कमी पैश्यात जास्तीत जास्त जीववाचवणाऱ्या यंत्रणा उभारणे सोबत सरकारचा खर्च देखील वाचवणे हा उद्देश आहे.

चोपडा ( एस बी नाना पाटील ) – लोकसहभाग चळवळीची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे या मातीतील संत व लोकनेते यांनी त्याचा मजबूत पाया घातलेला असून स्वर्गीय आर आर आबा यांनी गावातील प्रत्येक कामात ५%लोकसहभागाची अट ठेवली होती जेणेकरून ती परंपरा पुन्हा सुरू व्हावी.परंतु आपल्या व्यवस्थेने त्यात मार्ग शोधून काढला नफ्यातून ती रक्कम कॉन्ट्रॅक्टर ने भरावी व अतिशय चांगल्या विचारांनी सुरू केलेल्या योजनेचा फज्जा उडाला.

आज कुणाला पटो ना पटो परंतु या महामारी चे काळात लोकसहभागाची चळवळ चोपडा तालुक्यातून सुरू झाली व सुरवातीला संपूर्ण जळगाव जिल्हा व आता तर संपूर्ण महाराष्ट्र त्या दिशेने वाटचाल करीत आहे,याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.सगळ्यात कौतुक म्हणजे मदत देताना गरीब श्रीमत हा भेद तर सोडाच ,साऱ्या भारतभर वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश जाईल एव्हढे चांगली मदत साऱ्यांनी केली मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यातून माणुसकी व राष्ट्रीयत्व ची भावना चोपडा तालुक्यात किती प्रचंड रुजली आहे,याचेच हे द्योतक आहे.

आज साऱ्या लोकसहभाग चे कामाचा कळस म्हणजे आपण स्वतःचा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा केला,नव्हे देशात येवढ्या चांगल्या प्रतीचा एवढ्या कमी किमतीत आज देखील होणे शक्य नाही.परंतु ईश्वरीय शक्तीच्या कृपेने व आमच्या संपूर्ण टीम चे चौकस पना मुळे आपण ते शक्य केले.त्यातील प्रत्येक भाग हा उत्कृष्ट गुणवत्तेच्या कंपनी कडून खरेदी केले आहेत. प्लांट घ्यायचे ठरवल्यापासून फक्त दोन आठवड्यात तो आपण बसवीत आहोत. आज देशात लोकांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देखील महिना महिना उपलब्ध होत नाहीत ,आपण मात्र प्लांट उभा केला ही निश्चितच भगवंताची/अल्लाह/गॉड/महावीर/गौतम बुध्द जी काही भगवंताची रूपे आहेत त्यांची कृपा आहे असे आम्ही मानतो.हे नव्हे सारीच कामे त्यांनी आमच्या कडून करून घेतली हा आम्ही आशीर्वाद मानतो.

आपल्या प्लांट मध्ये वातावरणातील हवा कॉम्प्रेसर मध्ये ५kg/cm२ या दाबाने ड्रायर मध्ये पाठवून त्यातील आद्रता पूर्ण पने शोषून कोरडी हवा पुढे Pressure Swing Adsorption (PSA) चे स्टेनलेस स्टील चे टॉवर ज्यात बाहेरच्या देशातून आयात केलेल्या molecular sieves मधून पास केली जाते व त्यात ऑक्सिजन,नायट्रोजन व इतर वायू वेगळे केले जातात व वेगळा केलेला ऑक्सिजन पुढे टाकीत जमा केला जातो, तेथून पुढे तो पुन्हा ४kg/cm२ दाबाने आपल्या रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप लाईन मार्फत रुग्णांना दिला जातो.विशेष म्हणजे विजेचा सप्लाय बंद झाला तर डिझेल generator वर देखील तो चालतो,म्हणजे कुठेही काही अडचण आली तरी तो सुरू राहील.

या साठी साधारणपणे १५ होंर्सपॉवर विजेचा सप्लाय लागतो म्हणजेच दिवसभरात पूर्ण चोवीस तास चालला तर २७०युनिट वीज लागते प्रती युनिट सारे खर्च मिळून₹१०/- प्रती युनिट जरी काढले तरी ₹२७००/- चा दिवसभर खर्च आहे.आज सरकारी रुग्णालयांना प्रती मागील कोरोणा काळात एक सिलिंडर भरून आणे पर्यंत ₹४५०/- किमान लागत होते आज तर ₹१०००/- लागतात व जर एकवीस सिलिंडर चा एकूण रोजचा खर्च ₹५५००/- होता आज ₹२१०००/- होत आहे. याचा अर्थ आधीचा हिशोब काढला तरी महिन्याला आपण सरकारचे ₹१०००००/- वाचवनार आहोत तर आज ऑक्सिजन कमतरतेची वेळी महिन्याला ₹५,४००००/- वाचविणार आहोत.

भावांनो आपण लोकांचे निधीतून फक्त जीवच वाचविणार नाहीत 🙏तर लाखो रुपयांची सरकारची बचत देखील करणार आहोत.
ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत.आमची सारी टीम ही ध्येयाने पछाडून हे काम करीत होती.त्यात प्रामुख्याने प्रांत मॅडम सीमा ताई अहिरे,प्रांत सुमित जी शिंदे, डी वाय एस पी रायसिंग साहेब,तहसीलदार अनिल जी गावित,पोलीस निरीक्षक चव्हाण ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अराक ,डॉ मनोज दादा पाटील,गटविकास अधिकारी कोसोदे,मुख्य अधिकारी अविनाश गांगोडे,डॉ गुरुप्रसाद वाघ,डॉ प्रदीप लासूर कर,डॉ चंद्रकांत बारेला, तहसीलदार साळुंखे,राजेश पौळ,महेश पानघंटीवार,सुरेश चावरे ही सरकारी मंडळी.

तर उद्योजक राहुल सोनवणे,सी एस पाटील,संजीव बाविस्कर,दीपक पाटील,सुनील महाजन,मयुर शिंदे,रमाकांत सोनवणे,स्वप्नील महाजन,शेख साबीर शेख सिद्दिक,शेख मुख्तार,मुन्ना सोमाणी प्रा.विशाल पाटील,कुलदीप पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

तर चोपडा तालुक्यातील सारे डॉक्टर्स, त्यांच्यासाऱ्या संघटना, मेडिकल दुकानदार,कृषी दुकानदार संघटना, ठिबक सिंचन संघटना संच विक्रेता संघटना,महसूल विभागातील वेगवेगळ्या संघटना व प्रचंड पातळीवर व्यक्तिगत मदत करणारे असंख्य सारे सज्जन व त्यात मरण जवळ दिसत असताना देखील मदत करणारे स्वर्गीय हणमंत सोनवणे यांचे योगदान खूप मोलाचे ठरले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *