नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन

Featured मुंबई
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सितारामन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

35 हजार कोटी रुपये लसीकरणासाठी या आर्थिक वर्षात राखून ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितलं. पण यासाठी कुणाला मोफत, कुणाला पैसे द्यावे लागणार याचा अद्याप उल्लेख नाही.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *