
मोड येथील युवकांची विनामोबदला मास्कची निर्मिती
तळोदा (अक्षय कलाल ) – कोविंड १९ ने जगभर थैमान माजवलेलं आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलिस प्रशासन व शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येकाने आपली काळजी कशी घ्यावी घरात सुरक्षित राहून या आजारापासून कसे मुक्त राहावे. मास्कचा वापर करावा. यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला प्रशासनाकडून सांगितल्या जातात.
कोरोना चा प्रसार किंवा संसर्ग टाळण्यासाठी घरात राहणे तसेच मास्कचा वापर करणे हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. मोड ता.तळोदा येथील अरविंद शिंपी व सागर लोहार या दोन तरुणांनी स्वतः मास्कची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला तयार केलेले 100 मास्क शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी मा.पुंडलिक सपकाळे यांना दाखविली व साहेब आपण आम्हाला कापड व दोरा उपलब्ध करून दिल्यास अशा बरेच मास्क आपल्याला मोफत वितरणासाठी आम्ही तयार करून देऊ असे सांगितले. साहेबांनी त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी पाहून त्यांना स्वतः 100 मीटर कापड व इतर लागणारे साहित्य खरेदी करून दिला. त्या कापडातून अरविंद शिंपी याला सागर लोहार यांनी मदत करत मास्क ची निर्मिती सुरू केली. हे दोघं तरुण मागील 10 दिवसापासून दररोज 300 मास्क ची निर्मिती करत आहे व साहेबांच्या हस्ते ते मास्क गरजू लोकांना मोफत वितरण होत आहे.
लॉक डाऊन कालावधीत दोघं तरुणांच्या या सामाजिक कार्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा मा.पुंडलिक सपकाळे साहेब यांनी या दोघांना “कोरोना वारियर्स” हे सन्मानपत्र देत सन्मानित केले व सामाजिक कार्यासाठी त्यांचे मनोबल वाढविले. या युवकांच्या निस्वार्थ कार्यामुळे परिसरात कौतुक केले जात आहे व आदर्श घेण्याची गरज आहे.