
खाजगी हाॅस्पिटल्ससह इतर ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावी : धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
खाजगी हाॅस्पिटल्ससह इतर ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावी : धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
जिल्हाधिकारी धुळे, प्रांताधिकारी व तहसिलदार शिरपूर यांच्याकडे मागणी खाजगी हाॅस्पिटल्स सह इतर ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावी तसेच धुळे जिल्ह्यात केंद्र सरकारचे निरीक्षण पथक पाचारण करावे : धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): शिरपूर तालुका सह धुळे जिल्ह्यातील काही खासगी हॉस्पिटल्स सह इतर ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात यावी तसेच जिल्हात केंद्र सरकारचे निरिक्षण पथक पाचाराण करण्यात यावे अशी मागणी धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव धुळे, प्रांतधिकारी डाॅ. विक्रम बादल शिरपूर, तहसिलदार आबा महाजन शिरपूर यांना भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी (दि.२७ जुन) रोजी ईमेलने पाठवलेल्या निवेदनाव्दारे मागणी केली आहे. निवेदनात नमुद केले आहे कि धुळे जिल्हातील शिरपूर तालुका सह साक्री, शिंदखेडा व धुळे तालुकात विविध क्षेत्रात गेल्या आठ दहा दिवसात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळले आहेत. सध्याचा रुग्ण आढळण्याचा कल लक्षात घेता शिरपूर सह जिल्हातील निश्चित केलेली कोविड रुग्णालयांच्या क्षमतेच्या पलिकडे रुग्णसंख्या पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णांना आयसीयू व व्हेंटिलेटर यांची आवश्यकता भासणार असे तज्ज्ञांचे मत आहे म्हणून त्याकरिता जिल्हा प्रशासन व जिल्हातील नगरपालिका यांच्या समन्वयाने क्षेत्रातील खासगी रुग्णालये खासकरून सुपर स्पेशालिटी रुग्णालये अधिग्रहित करावी तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर सुविधा असलेले ठिकाणे सुध्दा अधिग्रहित करावी व त्याठिकाणी कोविड सेंटर सुरु करावीत अशी आपल्याकडे मागणी करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात अन्य शहरात अश्या प्रकारे कोविड रुग्णसेवेसाठी खासगी रुग्णालये इतर चांगले ठिकाण अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. धुळे जिल्हात केंद्र सरकारचे निरिक्षण पथक पाचारण करण्यात यावे व याबाबत अधिक वेळ न घालवता आरोग्य आणीबाणीच्या दृष्टीने व रुग्णांचा मूल्यवान जीव वाचविण्यासाठी काळाची गरज म्हणून खासगी रुग्णालये तसेच इतर चांगले ठिकाण अधिग्रहित करावीत अशी मागणी धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे, प्रांतधिकारी डाॅ. विक्रम बादल शिरपूर, तहसिलदार आबा महाजन शिरपूर यांचाकडे केली आहे.