कडक लॉकडाऊन काळात यावल व रावेर तालुक्यात खाजगी फायनान्स कंपनी एजंटांचा धुमाकुळ

Featured जळगाव
Share This:

कडक लॉकडाऊन काळात यावल व रावेर तालुक्यात खाजगी फायनान्स कंपनी एजंटांचा धुमाकुळ..!

सर्वसामान्य महिला व जनतेचा संसार चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता.

परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या संबधित मंत्री व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज… !

यावल सुरेश पाटील):यावल व रावेर तालुक्यात गेल्या 1ते2महिन्यापासुन काही खाजगी फायनान्स कंपन्याच्या एजंटांनी लोनचा EMI हप्ता भरण्याचा तगादा लावल्याने ग्रामीण भागातील महिलांचे,नागरिकाचे लहान व्ययसायिकांचे जन-जिवन विस्कळीत झाले आहे,जसे काही त्यांच्या आनंददायी जीवनावर विरजण पडले की काय.?यावल व रावेर तालुक्याचे शासन प्रशासना कडून कोरोना आटोक्यात आणणेसाठी खुप प्रयत्न सुरु आहेत मात्र लॉकडाऊन काळात अनेकाना लोन च्या EMI हप्ते भरणे मुश्किल झाले आहे?लोनचा 1,EMI मासिक हप्त्याचा एक दिवस चुकला तर कर्ज धारकाकडून 500 ते 2000 हजार रुपया प्रयन्त पेनल्टी/व्याज/ किंवा दंड वसूल करण्यात येत असल्याने खाजगी फायनान्स कंपन्यांकडून लोन घेणारे वैतागले आहेत या अनधिकृत बेकायदेशीर कृत्याला आळा कोण लावणार ?असा प्रश्न यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात उपस्थित केला जात आहे.या लोन EMI च्या तगाद्याने मात्र,सर्वसामान्य जनतेचे जिवन जगणेच कठीण झाले आहे,संसार गाडा चालवणेच जिकरीचे झाले आहे,घरात परिवाराला खाऊ घालायचे की EMI भरायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून खाजगी फायनान्स कंपन्यांनी किमान कोरोना कालावधीत तरीEMIहप्ते भरण्यास सवलत देऊन पहिला हप्ता चुकल्यावर सुद्धा पेनल्टी किंवा दंड आकारू नये असे बोलले जात आहे या परिस्थितीचा विपरीत परिणाम यावल रावेर तालुक्यातील काही महिला बचत गटावर सुद्धा आर्थिक संकट ओढवले आहे, ते सुद्धा वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत, बचतगट महिला मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत?आता यांचे संकट कोण दुर करणार? संबंधित अधिकारी दुर करणार की मंत्री दुर करणार याकडे मात्र भुसावळ विभागासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधुन आहे.महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रासह राज्य शासनाने कडक लॉकडाऊन लावले आहे.एकीकडे बाहेरगावी कंपन्यांमधे काम करणारे मजुर,कापड दुकानात काम करणारे मजुर,किराणा दुकानांवर काम करणाऱ्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर कडक लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे.स्वत;चे पोट भरणेही कठीण झाले आहे,तर लोन EMI हप्ते व EMI मासिक हप्ता व त्यावरील दंड पेनल्टी कसे भरतील. या EMI लोन हप्त्यांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता नागरिक व महिलांना जणु आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे चित्र सद्यास्थितीत पहावयास मिळत आहे.व जनतेकडून विविध चर्चा ऐकवण्यास मिळत आहे.अशा ह्या बिकट परिस्थितीमधे देखील यावल व रावेर तालुक्यातील काही ठराविक फायनान्स कंपन्यांनी,एजटांनी लोन धारकांकडे लोनचा हप्ता भरण्यासाठी चक्करा मारणे सुरु केले आहे.कडक लॉकडाऊन संचारबंदीत 5ते6एजंट हे लोन धारक महिलांच्या घरोघरी जातांना दिसत आहे,काही वसुली करणारे महिलांशी गैरवर्तणूक करीत असल्याचे सुद्धा बोलले जात असून दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी व शासन,प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून जिल्हाबंदीसह गावबंदी देखील करावी.या गावबंदीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.जेणेकरुन बाहेरील व्यक्तीला गावप्रवेश बंदी करावी.आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सर्वसामान्यांना शासनाने घरातच ठेवावे.परंतु ह्या खाजगी फायनान्स कंपनी एजंटाना मात्र जोपर्यंत लॉकडाऊन आहे,तोपर्यंत तरी सर्वसामान्यांकडुन लोन EMI चे हप्ते सद्यास्थितीत तरी स्थगित करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,कोरोना पेक्षाही भयानक…परिस्थिती कर्जधारक व्यक्तींवर आली आहे तरी संबधितांनी या संपुर्ण वस्तुस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा.अशी रास्त स्वरुपाची मागणी यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील जनतेची आहे तरी संबंधित यंत्रणा काही दिलासादायक निर्णय घेतील का?याकडे मात्र जळगाव जिल्ह्यासह यावल-रावेर तालुक्याच्या जनतेचे लक्ष वेधुन आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे संबंधित अधिकाऱ्यांना मार्फत काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *