शिरपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनाची माहिती जनतेने जाणुन घ्यावी : आ. काशिराम पावरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनाची माहिती जनतेने जाणुन घ्यावी : आ. काशिराम पावरा
केंद्र सरकारच्या वर्षपुर्ती निमित्त पत्रके पदाधिकार्यांनी घरोघरी पोहचवावे : भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूर ( मनोज भावसार ) : देशातील मतदारांनी नरेंद्र मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान केले. गरीबांच्या कल्याणासाठी, देशहीतासाठी मोदीनी अनेक योजना अमलात आणल्या. त्या योजनांची माहीती गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम भाजपा तर्फे सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ख-या अर्थाने विकास योध्दा आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची उर्मी त्यांच्यात आहे. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात देशात दुस-यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी या द्रष्टया नेत्याने राष्ट्रव्यापी अभियान हाती घेतले. कोरोनाच्या महामारीच्या जागतीक संकटाचा सामना करताना आपल्या ओजस्वी कामगीरीने जगाला दिशा दाखविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने केले आहे. त्यांनी अनेक विविध योजना अमलात आणल्या असुन जनतेने योजनाची माहिती जाणुन घ्यावी असे आवाहान आ. काशिराम पावरा यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या टर्मच्या प्रथम वर्षपुर्ती निमित्त शिरपूर तालुका भाजपा तर्फे आयोजित संपर्क अभियानाचा शुभारंभ (दि.१९ जुन) रोजी तालुक्यातील सुळे (आ.पावरांचे गाव) येथे करण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करत अभियानाचा श्रीगणेशा झाला. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीतील निर्णयांची माहीती त्यांनी दिली. स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरु आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किसान पेन्शन योजना, लघु व्यापारीक मानधन योजना, हर घर जल योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातुन सर्व घटकांना दिलासा देणारे निर्णय त्यांनी घेतले. देशाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील हे 6 वर्ष सुवर्णाक्षरात नोंदविले जाणार आहेत.
गेल्या 1 वर्षात जे महत्वपुर्ण निर्णय त्यांनी घेतले हे सर्व घटकांसाठी कल्याणकारी आहेत असे पावरा यांनी सांगितले. भाजपा धुळे मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्दितीय कार्यकाळातील प्रथम वर्षपुर्ती निमित्त मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती पत्रके जनतेपर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्तेंनी मेहनत घ्यावी असे आवाहान केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या महामारीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय या देशाला सुरक्षा कवच प्रदान करणारे ठरले असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे भुषण असल्याचे प्रतिपादन भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी बोलताना सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिरपूर कृउबा समिती संचालक सुक्रराम पावरा, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, सामाजिक कार्यकर्ते शिकराम पावरा, जिल्हा परिषद सदस्य आरतीबाई पावरा, पं. स. सदस्य छायाबाई पावरा, आशाबाई पवार, सरपंच शरमीबाई पावरा, उपसरपंच शिवलाल पावरा व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती. यावेळी भारत चीन सिमेवरील चकमकीत शहिद झालेल्या भारतीय सैन्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहाण्यात आली. सुत्रसंचालन व आभार किशोर कुंभार यांनी केले.