
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य मिळून दिले : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य मिळून दिले : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी
शिरपूर (मनोज भावसार): शेतकऱ्यांचा बाजूने केंद्र सरकारने केलेल्या कायदयाच विरोधक उसने आवसान आणत विरोध करत असले तरी शेतकरी राजा मात्र कायदयाच स्वागत करत आहे. केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्य सरकारने तातडीने लागु करावा हा कायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे हा कायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्रय मिळवून देणारा आहे. त्याने उत्पादीत केलेल्या शेतीमाल याचा शेतकरी अखेर पर्यन्त मालक असून दलालांची दुकानदारी बंद झाली असे आ. काशिराम पावरा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत शेतकरी विधेयक पास करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवली. त्याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव नेतृत्व आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे जरी झाले तरी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट आता खऱ्या अर्थाने उगवली. जे लोक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताच्या आड येत होते आणि दलाली करुन आपली दुकानदारी चालवत होते त्यांची दुकानदारी या नव्या कायद्याने बंद होईल. आणि शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व प्रतिष्ठा वाढेल या शब्दात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी नवीन कायद्याचे समर्थन केलं. देशात आणि राज्यात विरोधाला विरोध म्हणून काँग्रेस व डाव्या विचाराचे लोक पुढे येत असले तरी शेतकऱ्यांच्या फडात बळीराजा या निर्णयाचे जोरदार स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्यात तातडीने लागु करावा व राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणीचे निवेदन शिरपूर तहसिलदार आबा महाजन यांना देण्यात आले. त्या नंतर कार्यालयच्या आवारात (दि.१२आॅक्टो) सोमवार रोजी स. ११:०० वाजेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा निर्णय विरोधात स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचा निषेध असो भारतीय जनता पार्टी जिंदाबाद भारत माता की जय अश्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर पं. स. सभापती सत्तारसिंह पावरा, भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, एन. डी. पाटील, जि. प. सदस्य देवेंद्र पाटील, महेंद्र पाटील, प्रशांत चौधरी, नितीन राजपुत, संजय चौधरी, शामकांत ईशी, सुरेंद्र राजपुत, पिंटु बंजारा, भास्कर बोरसे, मुबीन शेख, दिलीप पटेल, जगतसिंग राजपुत, रफिक तेली, सुनिल चौधरी, राजुलाल मारवाडी, श्रीकृष्ण शर्मा, हिरालाल कोळी, अविनाश शिंपी, अनिल गुजर, अनिल बोरसे, भालेराव माळी, प्रकाश गुरव, हेमराज राजपुत, सुनिल मगरे, भास्कर सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.