राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली साबरमती आश्रमास भेट

Featured देश विदेश
Share This:

अहमदाबाद (तेज़ समाचार डेस्क ): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय औपचारिक भारत दौऱ्याची सुरवात अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प यांनी साबरमती आश्रमास भेट दिली आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केले.

साबरमती आश्रमात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्रम्प परिवाराचे खादी अंगवस्त्र भेट देऊन स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मिलेनिया ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पारंपरिक सुताचा हार अर्पण केला.

साबरमती आश्रमातील इतर जागांना भेट दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मिलेनिया ट्रम्प यांनी चरख्यवार सुत करण्याचा अनुभव घेतला.

पंतप्रधान नरेंद मोदी तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना महात्मा गांधी आणि चरखा याबाबत माहिती दिली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मिलेनिया ट्रम्प यांनी साबरमती आश्रमातील अभ्यागत पुस्तकात आपल्या भावना व्यक्त केल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले, ” माझे मित्र पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यामुळे उत्तम भेट झाली धन्यवाद “

साबरमती आश्रमाचा कार्यक्रम आटपून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मिलेनिया ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद मोदी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियम कडे रवाना झाले. यावेळी साबरमती आश्रम ते मोटेरा स्टेडियम या मार्गात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मिलेनिया ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांची एक झलक टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *