
यावल : विश्व मराठा संघ युवक तालुकाध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची निवड
यावल ( सुरेश पाटील) तालुक्यातील चुंचाळे येथील वि.का.सो.संचालक ज्ञानेश्वर नथ्थु पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांची विश्व मराठा सघांच्या युवक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची निवड जिल्हाध्यंक्ष प्रशांत रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य मध्ये बऱ्याच कालावधी पासून जळगाव जिल्हा कार्यकारिणीत कार्य पार पाडत असल्याने आपल्या कार्याची दखल घेत संघटनेने आपल्या समाज प्रती असलेली तळमळ आणि धळपळ पाहून चुंचाळे ता.यावल येथील प्रतिक ज्ञानेश्वर पाटील यांची यावल युवक तालुकाध्यक्ष या पदाची जबाबदारी देण्यात येत आहे आपण विश्व मराठा संघांने दिलेली ही जबाबदारी संघटनेचे नियम आणि सर्व बंधने पाळून चांगल्या प्रकारे कार्य पार पाडावे त्यांच्या या निवडीचे प्रशांत(बाबा) रामदास पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव,तुषार पाटील फैजपुर,देवेंद्र साठे जामनेर यांनी अभिनंदन केले तसेच चुंचाळेसह परिसरात त्यांच्या या निवडीचे कौतुक होत आहे.