खान्देशातील तंत्रशिक्षणाची संख्यात्मक वाढ व गुणात्मक विकास या विषयी संशोधनावर  प्रशांत महाजन यांना पी एचडी प्रदान

Featured धुळे
Share This:

खान्देशातील तंत्रशिक्षणाची संख्यात्मक वाढ व गुणात्मक विकास या विषयी संशोधनावर  प्रशांत महाजन यांना पी एचडी प्रदान

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत मागास समजल्या जाणाऱ्या खान्देशाने मागील काही वर्षांत शिक्षणाच्या  क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रचलित शिक्षणासह अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र या विद्याशाखाचे अद्ययावत व अत्याधुनिक शिक्षण देणारी अनेक नामांकित महाविद्यालये व शैक्षणिक संकुले आज खान्देशात कार्यरत आहेत. परंतू, तंत्रशिक्षण क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असूनही मागील काही वर्षात खान्देशातील विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षणाकडे काहीशी पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर, विपणन शास्त्र रणनीती व मूल्यांकित सेवा या आधारे, खान्देशातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील संख्यात्मक वाढ व गुणात्मक विकास  कशी होवू शकते या विषया संबधी संशोधन सादर करून येथील आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव, प्रशांत तुकाराम महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत नुकतीच पी.एचडी. पदवी प्राप्त करीत  उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव प्रशांत महाजन यांनी एस पी डी एम महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.एस बी गोलाहीत यांच्या मार्गदर्शनाखाली “ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन खान्देश रिजन विथ स्ट्रेटेजिक मार्केटिंग अँड वॅल्यू बेस्ड सर्विसेस” या विषयावर संशोधन केले. या संशोधाना दरम्यान त्यांनी खान्देशातील धुळे , जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील शहरी  व ग्रामीण भागातील सुमारे ३००० भावी, आजी व माजी विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक  व कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली व या विद्यार्थ्यांच्या मते खांदेशातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालये यांनी  गुणवत्तेवर आधारित पुरविलेल्या सोईसुविधा, अध्यापन पद्धती, कॅम्पस प्लेसमेंट, गुणवत्ता, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास या बाबतीत राबविले जाणारे उपक्रम यासह विविध विषयांचा  पाठपुरावा घेतला. या सांखिकी माहितीच्या विश्लेषणा वरून डॉ. महाजन यांनी खान्देशातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणा क्षेत्राच्या वाढीचा व विकासाचा आढावा आपल्या संशोधान प्रबांधात मांडला आहे. त्यांच्या संशोधनानुसार, तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भावी विद्यार्थ्यांच्या जटिल व वेळेप्रमाणे बदलणार्‍या गरजेचे योग्य पद्धतीने विभाजन करून त्या अनुषंगाने उत्कृष्ठ सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थां संबंधित महाविद्यालयाकडे आकर्षित होवू शकतात. तसेच आजी व माजी विद्यार्थ्यांचे मत व त्यांच्या गरजांच्या आधारे त्यांना पुरविण्यात आलेल्या सोई-सुविधा यांच्या योग्य मिश्रणाने विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच  कौशल्य व व्यक्तिमत्व विकास गुण  कसे विकसित होतील, त्यांचा समाधानाचा स्तर कसा उंचवेल व तसेच त्यांच्या कडून होणाऱ्या मौखिक प्रसिद्धी द्वारे महाविद्यालयाचा नावलौकिक होवून भविष्यात प्रवेश कसे वाढू शकतील याची सांखिकीय प्रतिकृती तयार केलेली आहे. केवळ महाविद्यालयेच नव्हे तर विद्यार्थ्यांचीही कामगिरी उंचवण्यात ही सांखिकीय प्रतिकृती कश्याप्रकारे उपयुक्त ठरेल हे डॉ. महाजन यांनी या संशोधना मार्फत दाखविले.त्यांनी केलेल्या भावी, आजी व माजी या तीनही विद्यार्थांच्या अनुभवांवर व शैक्षणिक करकीर्दीवर  आधारलेल्या या  संशोधांनाचा  खान्देशातील अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षणाची संख्यात्मक वाढ व गुणात्मक विकास  होवून परिणामी उद्योगाच्या व तत्सम क्षेत्रात कार्य करणाऱ्या घटकांना, महाविद्यालयांना, उद्योगांना, पालकांना व विद्यार्थ्यांना या संशोधनाद्वारे निघालेल्या निष्कर्षांचा  फायदा नक्कीच होवून खानदेशातील तंत्रशिक्षणाचा पर्यायाने  समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावेल यात शंकाच नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेतंर्गत अश्या प्रकारच्या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर करण्याचे महत्वाचे काम डॉ.महाजन यांनी केले आहे.
डॉ.प्रशांत महाजन  यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व दर्जेदार  जर्नल्स मध्ये  १५ हून अधिक शोध निबंध प्रसिध्द झालेले असून राष्ट्रीय व राज्य स्तरावरील  सात संशोधन चर्चासत्र व कार्यशाळा मध्ये  त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे.
डॉ. प्रशांत महाजन हे शिरपूर येथील  रहिवासी असून ते एस पी डी एम महाविद्यालयातील वरिष्ठ व सेवानिवृत्त प्राध्यापक, माजी अधिष्ठाता उमवि, जळगाव  व चोपडा येथील पंकज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.टी टी महाजन याचे सुपुत्र आहेत.
डॉ. प्रशांत महाजन यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष श्री. भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री राजगोपाल भंडारी, संचालक तपन पटेल, माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के.बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे,  विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल,प्रा डॉ नितीन पाटील, प्रा प्रवीण सरोदे, प्रा, विजय पाटील, प्रा तपकीरे यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *