विज बिल न भरल्यामुळे एका शासकीय कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित

Featured जळगाव
Share This:

विज बिल न भरल्यामुळे एका शासकीय कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित.
शासकीय दबाव वाढल्याने दोन दिवसानंतर वीज पुरवठा सुरळीत.

यावल (सुरेश पाटील): यावल येथील एका कार्यालयाकडे एकूण दोन विज बिलांची अंदाजे पावणे दोन लाख रुपये थकबाकी झाल्याने शनिवार दिनांक19रोजी जळगाव येथील वसुली पथकाने यावल शहरात येऊन त्या शासकीय कार्यालयाचा वीज पुरवठा शनिवारीच खंडित केला होता.थकबाकीमुळे शासकीय कार्यालयावरच कारवाई झाल्याने अधिकारी,कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली शासकीय निधी वेळेवर प्राप्त न झाल्यामुळे वेळेवर वीज बिल भरणा न केल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याचे बोलले जात असले तरी थकबाकी बिल न भरता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासकीय वरिष्ठ स्तरावर वीज वितरण कंपनीवरच शासकीय लोडशेडिंग/दबाव आल्याने आज दिनांक21रोजी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे समजले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *