मनवेल थेथील पोस्ट मास्तरचा उष्कृष्ट कामाबद्दल डाकअधिक्षकांडुन गौरव

Featured जळगाव
Share This:

मनवेल थेथील पोस्ट मास्तरचा उष्कृष्ट कामाबद्दल डाकअधिक्षकांडुन गौरव

यावल ( सुरेश पाटील): तालुक्यातील मनवेल पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तरांनी कोवीड–90 महामारीच्या काळात भुसावळ विभागात सर्वाधिक ग्राहकांचे खाते उघडल्यांमूळे कार्यालयीन कामकाज चांगल्या प्रकारे केल्या बद्दल प्रमाणपत्र देऊन भुसावळ विभाग प्रमुख पी. बी. सेलुकर यांचेहस्ते पोस्ट मास्तर भगवान पाटील यांचा छोटेखानी कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

7नोव्हेंबर रोजी येथील अंगणवाडीत भुसावळ डाकघर विभागाकडुन पोस्ट खात्याच्या आधार एपीईएस अंतर्गत उष्कृष्ट काम विविध योजना व पोस्ट मास्तरच्या उष्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला.
यावेळी डाकघर निरीक्षक पी.एस.मालकर,साकळी पोस्ट मास्तर रमेश कुंभार,केदार बडगुजर,डी.आय. अग्रवाल, भरत तेली यांची विशेष उपस्थिती होती.
यावल आगारातील सेवानिवृत कर्मचारी दगडु पाटील यांनी इंडीयन पोस्ट आँनलाईन बँकेच्या सेव्हिंग खाते उघडून पैशाची गरज भासेल तिथे पैसे मिळणार असल्याने त्याचे कौतुक डाकअधिक्षक यांनी कौतुक केले,यावेळी पुरुषोत्तम पाटील माजी ग्रामपंचायत सदस्यं उदयसिंग पाटील, अनिल पाटील,गोरख पाटील, काशिनाथ पाटील,शांताराम पाटील, वासुदेव पाटील,अशोक पाटील सर,दगडी पो.पा.विठ्ठल कोळी यांचेसह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते येथील पोस्टमास्तर भागवत सिताराम सरोदे यांनी तसेच त्यांचे सहकारी जिवन उभारणे या दोघा मिळून गेल्या महिन्यात भुसावळ विभागात सर्वाधिक खाते उघडून विशेष कामगिरी दाखविली म्हणून त्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. पोस्ट ऑफिस मध्ये आता बँक सुविधा प्रमाणे सर्व सुविधा कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहेत, अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत त्यामुळे पोस्ट ऑफिस चा जास्तीत जास्त उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा असे आवाहन विभागप्रमुख सेलूकर यांनी केले तसेच ग्राहकांनी बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते उघडून पोस्ट खात्याला सेवा
करण्याची संधी द्यावी असे सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *