पॉझिटिव्ह रुग्ण रात्रभर घरात, आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा

Featured धुळे नाशिक
Share This:

यावल (सुरेश पाटील) किनगांव येथील एक व्यापारी काल दिनांक 11 रविवार रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह आल्याचे त्याला समजले. पुढील औषधोपचारासाठी त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल व्हायचे होते परंतु संबंधित यंत्रणेकडून रुग्णवाहिका न आल्यामुळे त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रात्रभर आपल्या घरात आपल्या कुटुंबीयांसोबत चिंताग्रस्त परिस्थितीत राहावे लागले आज सकाळी तो रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याचे समजले, आरोग्य विभागाच्या बेजबाबदार व दिरंगाईमुळे किनगांव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की किनगांव येथील एका व्यापाराला त्याचा स्वतःचा कोरोना पॉझिटिव रिपोर्ट आल्याचे समजले. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट ज्या यंत्रणेने त्या व्यापाऱ्याला दिला त्या यंत्रणेने संबंधित कोरोना पॉझिटिव व्यक्तीला कोवीड सेंटरला दाखल करणे बाबत तात्काळ कारवाई का केली नाही, संबंधित व्यापारी व्यापारी असल्या कारणामुळे किनगांव गांवात आणि परिसरात कोणाकोणाच्या संपर्कात आलेला आहे ? संबंधित अधिकाऱ्याला याबाबत सूचना का दिल्या नाहीत ? आणि संबंधित आरोग्य विभाग यंत्रणेला जर ही माहिती असेल तर त्या रुग्णाला तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून का दिली गेली नाही, आणि त्यामुळे त्या रुग्णाला रात्रभर आपल्या कुटुंबीयांसोबत चिंताग्रस्त परिस्थितीत राहावे लागले याचे जे विपरीत परिणाम होतील त्याला जबाबदार कोण ? त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने किनगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला नाही का ? तसेच किनगांव मध्ये एका व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला याची माहिती किनगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली होती किंवा नाही ? याबाबत फैजपूर विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेन्‍द्र कुंवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बराटे यांनी या गंभीर घटनेकडे तसेच गेल्या 4 दिवसापूर्वी तालुक्यात ग्रामीण भागात एका गांवात कोरोनाग्रस्त मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कोणाच्या आदेशान्वये करण्यात आले, कोरोनाग्रस्त रुग्ण मयत झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला कसा ? आणि दुसऱ्या दिवशी त्याच गांवातील एक कोरोनाग्रस्त व्यक्तीचे निधन शासकीय रुग्णालयात झाले असताना अंत्यसंस्कार करणेसाठी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांच गांवात अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह का दिला ? त्या गांवात कोरोनाग्रस्त मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कोणाच्या आदेशान्वये करण्यात आले ? याची सुद्धा चौकशी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी करून याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवून पुढील कडक कारवाई करावी अशी संपूर्ण यावल तालुक्यातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *