जातीय सलोखा कायम राहणे साठी पोलीस निरीक्षक धनवडे यांची लोकप्रिय कामगिरी

Featured जळगाव
Share This:

जातीय सलोखा कायम राहणे साठी पोलीस निरीक्षक धनवडे यांची लोकप्रिय कामगिरी

यावल (सुरेश पाटील) :तालुक्यातील साकळी येथील सध्या कोरोना या आजाराने गावात थैमान घातलेले आहे या दृष्टीने सामाजिक फार मोठी चिंतेची बाब निर्माण झाल्याने त्यात गांवात काही किरकोळ कारणावरुन समाजात मतभेद निर्माण झाले असून अशांततेचे वातावरण निर्माण झालेले असल्याने गांवाच्या प्रतिमेस बाधा निर्माण होऊ नये म्हणून तसेच जातीय सलोखा कायम राहणे बाबत. तसेच नेहमीच होणाऱ्या काही अप्रिय घटनांनी गावाची शांतता धोक्यात येत असते व या अशा वारंवार निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे गांवाची प्रगतीकडे वाटचाल न होता गांव एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. हि बाब नेहमी धर्मिक एकोपा दाखवणाऱ्या साकळी गांवासाठी फार चिंताजनक आहे या पार्श्वभूमीवर यावल पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या संकल्पनेतून व लोकांमध्ये धार्मिक एकते बाबत जनजागृती व्हावी याकरिता दि.१४ मंगळवार रोजी पोलिस प्रशासनाकडून लोकसहभागातून एका सुंदर प्रयोग राबविला. यात संपूर्ण गांवातून आपल्या पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांच्या सहभागाने रूट मार्च काढला. तर या रूट मार्च मध्ये  पोलिस प्रशासनाच्या गाडीवर ऑडिओ च्या आवाजात परमपूज्य  साने गुरुजी यांचा ‘ खरा तो एकची धर्म – जगाला प्रेम अर्पावे ‘  अशा मानवतेच्या गितांचा सुंदर सुर  सर्वत्र कानी पडत होता.यावेळी पोलीस निरीक्षक धनवडे हे स्वतः माईक हातात घेऊन वेगवेगळ्या धार्मिक महामानव व विविध राष्ट्र पुरुषांबद्दल सांगत गांवात सर्व धर्मांनी भाईचारा टिकवला पाहिजे. सर्वांनी एकजुटीने राहयला पाहिजे. एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान केला पाहिजे. तेव्हाच आपल्या गांवाची आदर्श अशी धार्मिक एकता मजबूत होईल. व गांवाचा धार्मिक एकतेचा सुगंध सर्वत्र जिल्हाभर दरवळेल यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित गुण्यागोविंदाने राहणं फार गरजेचा आहे. याबाबत अगदी स्पष्ट व नागरिकांना भावेल अशा लक्षवेधी शब्दात साकळी  ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या रुट मार्चच्या दरम्यान यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी गांवातील शाळेमधील विद्यार्थ्यांकडून     ‘ सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा ‘ यासारखी काही देशभक्तीपर गीते म्हणून घेतली. तर काही नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक धनवडे यांच्या संकल्पनेतील या आगळ्यावेगळ्या व धार्मिक एकता जपण्याबाबतच्या अभिनव प्रयोगाचे गांवात सर्वत्र  नागरिकांकडून यावल पोलिसांचे तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *