यावल तालुक्यात सहकारात विकासाच्या नावाखाली राजकीय चौफेर वादळ?

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यात सहकारात विकासाच्या नावाखाली राजकीय चौफेर वादळ?

सहकाराचे वाजले आहेत 12

राज्यात महाविकासआघाडीबाबत जबरदस्त ‘तू तू’- ‘मै मै’ परंतु यावल तालुक्यात शिवसेनेचा समन्वय कौतुकास्पद

यावल (सुरेश पाटील): कृषी उत्पन्न बाजार समिती यावल क्लिनिंग ग्रेडिंग युनिट व गोडाऊन बांधकामाचे लोकार्पण व नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका बघितली असता सहकारात विकासासाठी राजकारण न करता यावल तालुक्यातसह जिल्हास्तरीय सर्व राजकीय पक्षाची नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याने राजकीय विकासाचे चौफेर वादळ निर्माण झाले असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे, एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ.अशी प्रचलित म्हण असली तरी यावल तालुक्यातील सहकार क्षेत्राचे 90 टक्के बारा कोणामुळे वाजलेले आहेत, सूत गिरणी, मधुकर कारखाना,जिनिंग प्रेस सोसायटी बंद का पडल्या याचे आत्मचिंतन उपस्थित सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनीच करायला पाहिजे असे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांची शासकीय सत्ताधारी महाविकास आघाडी राज्य आहे.शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी बाबत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी कशाप्रकारे आरोप-प्रत्यारोप करून तोंडसुख घेऊन राज्यासह संपूर्ण देशातील नागरिकांसमोर राजकारणातील विरोधकाची भूमिका निभावत आहे हे सर्वांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.
अशी वस्तुस्थिती असताना यावल तालुक्यात मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील यांनी मात्र महाविकास आघाडीचे संपूर्ण ध्येय उद्दिष्ट बाजूला ठेवून, गुंडाळून भारतीय जनता पार्टी नेतेमंडळीसह सर्व राजकीय पक्ष मंडळींना एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे आमंत्रित करून जमविल्याने तालुक्यात महाविकास आघाडी बाबत आणि भारतीय जनता पार्टी बाबत तसेच तालुक्यातील सहकार क्षेत्रातील व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.कारण यावल तालुक्यात जे.टी.सहकारी सूतगिरणी,त्यानंतर यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ,यावल तालुका फ्रूटसेल सोसायटी,तालुक्यातील सहकारी पतसंस्था,शेतकऱ्यांना सतत आर्थिक ऑक्सिजन पुरविणारा मधुकर सहकारी साखर कारखाना इत्यादी सहकारातील सर्व प्रकल्पांची संस्थांची आज बिकट अवस्था कोणकोणत्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली आणि कालावधीत झाली आहे सहकारात काम करताना सर्वच राजकीय पक्षांनी राजकारणात विकासाच्या नावाखाली ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हा मंत्र म्हणून वेळोवेळी राजकीय स्तरावर आपली पोळी भाजून आरोप-प्रत्यारोप न करता आपले तोंड बंद ठेवले आहे.
अशी वस्तुस्थिती असताना कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांचा क्लिनिंग ग्रेडिंग युनिट व गोडाऊन बांधकामाचे लोकार्पण व नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका बघितली असता शिवसेनेचे पाणीपुरवठा व स्वच्छता व पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण नामकरण सोहळा तसेच या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून गेल्यावर्षी राष्ट्रवादीत गेलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे,माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे तसेच प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या रावेर विधानसभा मतदार संघेतील खासदार रक्षाताई खडसे, चोपडा विधानसभा मतदार संघ आमदार सौ.लताताई सोनवणे, भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन,आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील,भाजपाचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रावेर विधानसभा मतदारसंघ आमदार शिरीषदादा चौधरी या सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार सांडू सिंग पाटील यांच्यासह संचालक मंडळाने आमंत्रित केले आहे यामुळे यावल तालुक्यात राज्यातील महाविकास आघाडी बाबत आणि प्रखर विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टी बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल तालुक्यातील सहकाराची वाट कोणी कशी लावली आहे याबाबत उपस्थित सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करायला पाहिजे असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *