अनिलभाऊ समर्थक ठेकेदारावर राजकीय दबाव आणि प्रभाव

Featured जळगाव
Share This:

अनिलभाऊ समर्थक ठेकेदारावर राजकीय दबाव आणि प्रभाव

नगरपरिषदेचे निविदा प्रकरण रंगणार …..

 

यावल ( सुरेश पाटिल ):  नगरपरिषद हद्दीत नदीकाठावर रहिवासी असलेल्या भागात संरक्षकभिंत बांधकाम करण्याचे अंदाजे 65 ते 75 लाख रुपयाच्या कामाबाबत यावल नगरपरिषदेने निविदा मागविल्या होत्या आणि आहेत, निविदा भरणार्‍या मध्ये एक तरुण होतकरू ठेकेदार भुसावळ येथील प्रभारी माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता असल्याने त्या ठेकेदारावर यावल शहरातील राजकारणाचा दबाव आणि प्रभाव येत असल्याने यावल नगरपरिषदेच्या निविदा प्रकरणाला चांगलाच राजकीय रंग येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यावल नगरपरिषदेत गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत ठराविक ठेकेदाराने कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून संबंधित काहींना लाखो रुपयाची टक्केवारी वाटप करून नगरपरिषद प्रशासनावर आपला प्रभाव आणि दबाव टाकून अनेक विकास कामे निकृष्ट प्रतीची आणि मंजूर प्लॅन इस्टीमेंट प्रमाणे न करता बोगस केल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात असले तरी आजी-माजी अनेक लोकप्रतिनिधी याबाबत ब्र शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत असे असताना नगरपरिषद हद्दीत नदीकाठावर संरक्षक भिंत बांधकाम करणे संदर्भात अंदाजे 65 ते 75 लाख रुपयांचे बांधकामाबाबत नगरपरिषदेने निविदा मागविल्या या प्रक्रियेत तीन ते चार ठेकेदारांनी आपल्या नावांसह कायदेशीर रित्या निविदा सादर केल्या आहे, यापैकी एक ठेकेदार यावल शहरातील तरुण तडफदार आहे परंतु सदर ठेकेदार हा भुसावल येथील प्रभारी माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता असल्याने यावल न.पा.च्या संबंधित ठेकेदारांना मोठे अडचणीचे आणि आव्हानात्मक ठरणार असल्याने त्या ठेकेदाराला राजकीय-सामाजिक करंट लावून त्यावर दबाव टाकून निविदा माघार घेणे संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्याने यावल नगरपरिषदेचे निविदा प्रकरण चांगलेच रंगणार असून भुसावळ नगरीचे प्रभारी माजी नगराध्यक्ष तथा यावल रावेर तालुक्याचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी अनिलभाऊ चौधरी यांच्या प्रतिष्ठेचा सुद्धा प्रश्न उपस्थित होत असल्याने याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून असले तरी ज्या ठेकेदाराची निविदा बिलो दराने असेल त्यालाच कामाचा ठेका निश्चित मिळणार असल्याचे ठेकेदारांना मध्ये बोलले जात आहे.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *