
धुळे : मशीद परिसात पोलिसांना जबर मारहाण
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). संपूर्ण देशासह धुळे जिल्हामध्ये सुद्धा संचारबंदी असुन सुद्धा देवपुरातील अंदरवाली मशीद परिसरात काही टोळकी अर्ध्या रात्री गप्पा मारत बसलेली होती. या टोळक्यांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगण्यावरून या टोळक्यांनी आणि त्यांचा समर्थनार्थ आलेल्या परिसरातील अन्य लोकांनी पोलिसाची कॉलर धरून मारहाण करण्याचा प्रकार येथे घडला आहे. तेव्हा या समाज विशेषच्या लोकांना कशाचीच भीती उरली नाही असेच दिसून येत आहे. याशिवाय या उदंड लोकांना दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाचे नुकसान सुद्धा केले. या प्रकरणी पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने २० जणांच्या जमावाविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मध्यरात्री देवपूर पोलिस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीवर होते. या परिसरातील इमाम अहमद रजा चौकात पोलिस पथक पोहोचले. या वेळी चौकात काही तरुण बसले होते. मध्यरात्र झाली आहे. आता घरी जा, असे पोलिस कर्मचारी प्रकाश शंकर थोरात व इतरांनी जमावाला सांगितले. त्याचा राग आल्यामुळे हबीब ऊर्फ बनैर अय्युब खान, रिझवान खान अफझल खान पठाण, अरबाज युनूस शेख, हमीद यांच्यासह सुमारे सहा ते सात जणांचे टोळके चालून आले. हबीबने पोलिस कर्मचारी थोरात यांची कॉलर धरली तसेच पोलिस कर्मचारी वंजारी यांना मारहाण केली.