भुकेल्या आई-बाबांसाठी जेवण आणायला गेलेल्या मुलाला पोलिसांनी हाणलं

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क). लॉकडाउनच्या दरम्यान जनतेच्या सेवेत दिवस-रात्र झटत असलेल्या पोलिसांचे पूर्ण देश भरात कौतुक होत आहे. त्यांच्या साठी लोक टाळ्या वाजवित आहे, दिवे लावत आहे. पण काही पोलिस अजुन ही आपल्या वर्दीचा रुबाब जनसामान्यावर काढण्याशी मुकत नसतांना दिसत आहे. एक व्हीडियो वायरल होत आहे. पुणे ग्रामीण मंचर परिसरातून समोर आलेल्या या व्हिडिओत दोन पोलिस कर्मचारी एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. हा तरुण आपल्या आई-वडिलांसाठी जेवण घेऊन जात असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर उच्च अधिका-यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात 21 दिवसांचा लॉकडाउन आणि कर्फ्यू जारी आहे. यामुळे कोणालाही बाहेर ये-जा करण्यावर बंदी आहे. हा व्हिडिओ शुक्रवारचा असल्याचे सांगतिले जात आहे. व्हिडिओत मार खाणार तरुण आपल्या भावासोबत आई-वडिलांसाठी जेवण घेऊन जात होता. त्याला घराबाहेर पाहताचा पोलिसांनी चौकशी न करता त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान संबंधित युवक पोलिसांना विनवणी करत होता की, तो आपल्या आई-वडिलांसाठी जेवण घेऊन जात आहे. मात्र पोलिसांनी त्याचे ऐकले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आता सोशल मीडियावर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *