पिंपरी : शहरातील ६३ केंद्रांवर आज लस

Featured पुणे
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क): महापालिकेकडे कोव्हिशिल्ड (covishield) लशीचे १६ हजार ४०० आणि कोव्हॅक्सिनचे (covaxine) ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शनिवारी (ता. ३१) ६३ केंद्रांवर केली आहे. गरोदर महिलांना आठ केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लस दिली जाणार असून, त्यांच्यासाठी २०० डोस राखीव आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे. (Vaccination at 63 centers in the city today pimpri chinchwad city)

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोव्हिशिल्ड लशीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेले असावेत. त्यांना पिंपरीतील नवीन जिजामाता केंद्रांवर २०० डोस उपलब्ध आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना आठ केंद्रांवर कोव्हिशिल्डचा पहिला व दुसरा डोस दिला जाईल. प्रत्येक केंद्रावर ३०० डोस उपलब्ध असून, प्रत्येकी १५० डोस पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी आहेत.

मात्र, १८ केंद्रांवर केवळ पहिला डोसच दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ २०० डोस उपलब्ध असतील. ४५ वर्षांवरील नागरिकांना ३४ केंद्रांवर पहिला व दुसरा डोस दिला जाईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रांवर ३०० डोस उपलब्ध असून, १०० डोस पहिला व २०० दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी असतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. कोविन ॲपवर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजता टोकन वाटप केले जातील. मात्र, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे.

कोव्हॅक्सिनचे नियोजन

कोव्हॅक्सिन लस सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी केंद्रावर ४५पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना आणि शिवतेजनगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना दिली जाणार आहे. दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी १०० डोस पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

गरोदर महिलांना आठ केंद्रांवर लस

गरोदर महिलांसाठी सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर दवाखाना, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा हॉस्पिटल चिंचवड या केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली आहे. त्यांच्यासाठी काही डोस राखीव ठेवले असून केंद्रावरच नोंदणी केली जाणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *