पिंपरी: कचरा डेपोत मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा खूनच- एकाला अटक

Featured पुणे
Share This:

पिंपरी: कचरा डेपोत मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा खूनच- एकाला अटक

पिंपरी (तेज समाचार डेस्क) :  मोशी कचरा डेपो येथे 9 जुलै रोजी मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मनोहर शिवाजी कांबळे (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विनोद मधुकर शिंदे (वय 32, रा. गणेशनगर, गवळीमाथा, भोसर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास मधुकर शिंदे (वय 23 रा. गणेशनगर, गवळीमाथा, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विनोद शिंदे कचरा गोळा करून उदरनिर्वाह करत होते. आरोपी मनोहर कांबळे आणि विनोद शिंदे हे मित्र होते. काही दिवसांपूर्वी विनोद आणि मनोहर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून मनोहर याने विनोद यांचा खून करून मृतदेह मोशी येथील कचरा डेपो जवळ टाकून दिला होता. 9 जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीस तपासात हा प्रकार खूनाचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. खुनाचा गुन्हा दाखल करत गुरुवारी (दि. 23) पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपी मनोहर कांबळे याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *