पिंपरी : 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसांसह 2 सराईत गुन्हेगारांना अटक

Featured पुणे
Share This:

पिंपरी : 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसांसह 2 सराईत गुन्हेगारांना अटक

पिंपरी (तेज समाचार डेस्क) :  दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई निगडी थरमॅक्स चौक या ठिकाणी सापळा रचून केली. संबंधित दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या प्रकरणी सोमनाथ भारत शिंदे (वय २६), आणि मंगेश सुनिल झुंबरे (वय २८) या दोघांना अटक केली असून निगडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे कर्मचारी आणि अधिकारी शहरात गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी दीपक खरात यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सोमनाथ आणि मंगेश हे दोघे दुचाकीवरून थरमॅक्स चौक येथे येणार असून त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार संबंधित ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळली असून निगडी पोलीस ठाण्यात आर्म अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संयज निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी दिपक खरात, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, वसंत खोमणे, उषा दळे, दिलीप चौधरी, विपुल जाधव, चेतन मुंढे, जयवंत राऊत, नामदेव राऊत, यांच्या पथकाने केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *