यावल : विवाहितेवर चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ

Featured जळगाव
Share This:

पती, सासू, सासरे नणंद या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

यावल ( सुरेश पाटील). सौ. पुनम युवराज तायडे, वय24 धंदा-घरकाम,  रा.मांगलवाडी ता.रावेर जिल्हा जळगांव ह.मु.ता.यावल जि . जळगाव हिने यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, मी सध्या माझा भाऊ- राहुल बापु सपकाळ,रा.अजाळे ता . यावल याचेकडे माझा मुलगा नक्ष,वय -04 वर्ष,याचे सोबत सुमारे 02 वर्षापासुन राहत आहे. माझे शिक्षण 12वी प्रयन्त आहे. माझे लग्न माझ्या वडीलानी दि.1/3/2016 रोजी मुळचे मांगलवाडी ता.रावेर येथील रहीवासी युवराज सिताराम तायडे यांचे सोबत करुन दिले असुन माझे लग्न अंजाळे तालुका यावल येथे समाजाचे रितीरिवाजानुसार झाले आहे . माझे लंग्न झाल्यानंतर माझे पती युवराज सिताराम तायडे , सासरे- सिताराम चावदस तायडे,सासु सौ. इंद्रायणी सिताराम तायडे, नणंद सरला यांचेकडे नादणेस गेली माझी मोठी नणंद कविता विनोद सोनवणे, रा.गोजोरे तालुका भुसावल ही आहे.

लग्नानंतर मला माझे सासरचे मंडळींनी सुमारे 7/8 महिने व्यवस्थित वागविले.लग्न झाल्यानंतर एक वर्षात मला मुलगा झाला. 2017मध्ये माझी लग्ना नंतर नणंद सरला हिचे लग्न झाले.व ती तिचे सासरी कोळीवाडा, जुनासातारा पुल भुसावळ येथे नांदणेस गेली. लग्नाचे सुमारे 01 वर्षांनंतर माझे सासरकडील मंडळीनी मला अत्यंत किरकोळ कारणावरुन त्रास देऊ लागली.व माझे चारित्र्यावर संशय घेत मला घालुन पाडुन बोलु लागले .

त्याबाबत मी माझे माहेरी आई वडील व भाऊ यांना सागंत होती.परंतु ते माझीच समजुत घालत होते की,धिर धर सर्व तुझ्याशी चांगले वागतील काही एक दिवस त्रास सहन करुन घे, असे समजावीत होती.माझ्या दोन्ही नणंदा नामे सौ.कवीता विनोद सोणवने रा.गोजोरे ता.भुसावल.सौ . सरला राहुल कोळी.रा.कोळीवाडा,जुना सातारा भुसावळ या,सुध्दा माझे चारित्त्यावर संशय घेवुन माझे पतीला वारंवार फोन करुन सांगत होत्या.त्यामुळे माझे पती त्यांचे सांगणेनुसार मला मारहाण करुन मला जेवणास न देता माझा मानसिक व शारिरिक छळ करीत होते.

सुमारे 02 वर्षापुर्वी आम्ही मांगलवाडी येथे राहणेस गेलो तेथे सुध्दा माझे सासरकडील मंडळी माझे भावास फोन करुन आता मला त्रास सहन होत नाही असे सांगितले त्यावरुन माझा भाऊ राहुल असे मांगलवाडी येथे आले होते.व मला तेथुन माहेरी घेवुन आलेने यावल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तेव्हापासुन मी माहेरीच आहे. त्यानंतर माझे सासरकडील कोणीही मला घेण्यास आले नाही अगर मला फोन करुन बोलविले नाही. म्हणुन मी नांदणेसाठी महीला तक्रार निवराण जळगाव येथे सुमारे 01 वर्षापुर्वी अर्ज सादर केला होता.

महीला तक्रार निवारणाचे अधिकाऱ्यानी त्यांना बरेच वेळा समेंटासाठी बोलाविले परंतु ते समेटासाठी आले नाही म्हणुन तेथील अधिकारी यांनी सदरबाबत यावल पोलीस स्टेशनचे नावे लेखी पत्र दिले त्या पत्रानुसार मी आज फिर्याद देण्यास आली आहे. तरी 1) युवराज सिताराम तायडे (पती) 2) सिताराम चावदस तायडे (सासरे), 3) सौ. इंद्रायणी सिताराम तायडे (सासु), 4) सौ. कविता विनोद सोनवणे (नणंद) ,5) सौ.सरला राहुल कोळी (नणद) यांनी वेळोवेळी संगनमताने सन 2017 ते आजपावेतो मी माझे सासरी अंजाळे, ता.यावल व मांगलवडी ता.रावेर येथे माझे पती सासु सासरे यांचेसह नांदत असताना माझे चारित्र्यावर संशय घेवुन मला मारहाण व शिवीगाळ आणि दमदाटी करुन माझा शारिरिक व मानसिक गांजपाट फेला व माझे व माझे मुलाचे उदरनिर्वाहाची कोणतीही तजवीज न करता मला व माझे मुलास टाकुन दिले .

म्हणुन माझी त्यांचे विरुध्द फिर्याद आहे या कारणावरून वरील पाच आरोपीच्या विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. अशोक जावरे हे करीत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *