
शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप राहणार बंद
शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप राहणार बंद,फक्त अत्यावश्यक साठी राहतील सुरु
शिरपूर (तेज समाचार डेस्क): जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ‘करोना’ विषाणूचा प्रसार देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने ‘करोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते.
‘संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असतांना देखील विनाकारण फिरणाऱ्यांंची संख्या कमी होतांना दिसत नसल्याने आज शिरपूर येथे खासदार हिना गावीत यांच्या उपस्थित आढावा बैठकीत अत्यावश्यक सेवा वगळता ईतर मोटरसायकलींंसाठी शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे.या आढावा बैठकीत प्रांताधिकारी विक्रम बांदल,तहसीलदार आबा महाजन यासह ईतर अधिकारी उपस्थित होते.उद्या पासुन दि १४ पर्यंत पेट्रोल पंप बंद राहणार असल्या बाबत सुचना करण्यात आले आहेत.