‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं शक्य’; शक्तिकांत दास यांनी केंद्राला दिला हा सल्ला

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ शकतात. तसेच इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणायचे असून, यासाठी महागाई नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. सातत्याच्या इंधनदरवाढीमुळे महागाई वाढत चालल्याचंही शक्तिकांत दास म्हणाले.

जागतिक स्तरावर कच्च्या तेलांच्या वाढत्या किमतीचे थेट परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होत आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम भारतासह सर्व अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारताचा परकीय चलन साठा 609 अब्ज डॉलर्स आहे, असं दास यांनी म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर 4 टक्के असणं अपेक्षित आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील अनिश्चितता कमी होईल. तसेच विकासाला बळ मिळू शकेल. गेल्या महिन्यात सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी कर्जावर हमी देण्याची घोषणा केली आहे. आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. याचा फायदा होईल, असं गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *