यावल येथील हॉटेल गोकुळचा परवाना कायमस्वरूपी रद्द
यावल येथील हॉटेल गोकुळचा परवाना कायमस्वरूपी रद्द
राजकारणात आणि शासकीय स्तरावर मोठी खळबळ.
यावल (सुरेश पाटिल ): महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 56 ( 1 ( ब ) अन्वये प्रधान करण्यात आलेल्या अधिकारान्वये यावल येथील हॉटेल गोकुळचा परवानाकक्ष अनुज्ञपती कायमस्वरूपी रद्द करीत आहे असा आदेश जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिनांक 14 मे 2020 रोजी काढला आहे. यामुळे तसेच हॉटेल गोकुळची जागा आणि संपूर्ण व्यवहार हे एका जिल्हास्तरीय महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली असल्याने संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात, राजकारणात व शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये दिनांक 31/ 3/ 2020 पासून जळगाव जिल्ह्यातील सर्व व मध्य विक्री अनुज्ञपत्या दिनांक 14 एप्रिल 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते तरी सुद्धा दिनांक 31 3 2020 रोजी संध्याकाळी 18 तीस वाजता यावल चोपडा रोडवर यावल शहरात बुरूज चौकात सार्वजनिक जागी आरोपी विजय सिंग नथुसिंग लोधी राहणार साखरी तालुका यावल हे त्याचे ताब्यातील मोटरसायकल क्रमांक NH.19.R.1953 हिचे वर बिना पास परमिट शिवाय त्याचे ताब्यात एकूण 4620 रुपये किंमतीच्या 33 विदेशी दारूच्या बाटल्या बाळगून वाहतूक करीत असतांना मिळून आला असता सदर गुन्ह्यातील आरोपी विजयसिंग लोधी याने ताब्यात मिळून आलेल्या विदेशी दारू कुठून आणली याबाबत यावल पोलीस तथा फिर्यादी यांनी माहिती विचारली असता त्यांनी सदरील माल हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार यावल येथून आणला असल्याचे सांगितले त्यावरून त्यांनी लागलीच राज्य उत्पादन शुल्क जळगाव चे पोलीस उपनिरीक्षक यावल यांच्याशी संपर्क करून त्यांना सदर माहिती दिली यावरून त्यांनी हॉटेल गोकुळ परमिट व बिअरबार यावलला लागलीच सील ठोकले होते आणि आहे, सदर प्रकरणी जिल्हाधिकारी जळगाव यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील हॉटेल बियरबार बंद ठेवणे बाबत आदेश पारित केलेले असताना देखील हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार यावल येथून विदेशी दारू विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याकरिता सदर हॉटेलचा परवाना रद्द करणेकामी पोलीस निरीक्षक यावल यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले होते आणि आहे.
हॉटेल गोकुळ परमिट रूम बियर बार परवाना यावल येथील नितीन श्रावण सोनार हे धारण करीत असल्याचे दिलेल्या परवाना वरून दिसून आलेले आहे याप्रकरणी हॉटेल गोकुळ परमिट रूम बियर बार मधील संपूर्ण साठ्याची मोजदाद केली असता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल यांना त्यावेळेस मोठी तफावत आढळून आली होती आणि आहे, तसेच गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विजयसिंग नथुसिंग लोधी याने हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार मधून सदरच्या मध्याच्या बाटल्या विकत घेतल्याचे पोलिसांसमक्ष कबूल केले आहे त्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल यांनी सदर अनुज्ञप्ती चे दिनांक 1 /4 /2020 रोजी निरीक्षण केले असता यावल पोलीस स्टेशन यांनी जप्त केलेल्या विदेशी मद्याच्या बॅच क्रमांक अनुज्ञप्तीच्या अभिलेख मधे जुळून आले आहे तसेच निरीक्षण दरम्यान अनुज्ञप्ती मध्ये विविध ब्रँड व क्षमतेच्या विदेशी मद्याच्या 1976 बाटल्या, बिअरच्या 825 व वाईन च्या 112 बाटल्या कमी मिळून आल्या आहेत यावरून सदर परवाना कक्ष अनुज्ञप्ती मधून लॉकडाऊन कालावधीत मद्याची विक्री केल्याचे स्पष्ट होते, तेव्हा हॉटेल गोकुळ एफ.एल-3 अनुज्ञप्ती क्रमांक 342 / 2019-20 यावल तालुका यावल जिल्हा जळगाव या परवाना कक्ष अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारकाकडून उल्लंघन झाले आहे असे दिलेल्या अहवालात नमूद करून सदर प्रकरणात हे गांभीर्य लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सदर अनुज्ञप्ती चे अनुज्ञप्ती धारकांनी उपरोक्त नियम नमूद आदेश व कायद्याचे तसेच मुंबई विदेशी मद्य नियम 1953 तसेच एफ.एल-3 अनुज्ञप्तीच्या अटी व शर्तीचा भंग केल्याचे सिद्ध होत असल्याने तसेच कोव्हिड 19 च्या देश व्यापी लाभ डाऊन कालावधीमध्ये बेकायदेशीरपणे मध्ये विक्री केल्याचे स्पष्ट होत असल्याने हॉटेल गोकुळ अनुज्ञप्ती परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या आदेश जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिनांक 14 मे 2020 रोजी काढलेला असून त्या आदेशाच्या प्रती नितीन श्रावण सोनार राहणार यावल हॉटेल गोकुळ अनुज्ञप्ती धारक यावल, यास तसेच माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव, भुसावल सर्व प्रभारी अधिकारी घटक जिल्हा जळगाव, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना निर्देशित करण्यात आलेले आहेत.
हॉटेल गोकुळ परमिट रूम बियर बार आणि उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांचे हितसंबंध
यावल येथील तत्कालीन तहसीलदार भुसावल येथील तत्कालीन प्रांताधिकारी आणि जळगाव येथील तत्कालीन उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या नावाने यावल येथील गट नंबर 679 /10 आहे, राहुल मुंडके यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वडिलोपार्जित शेत जमीन नसताना त्यांनी यावल तालुक्यात शेत जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा दिलेला नाही तसेच हॉटेल गोकुळ परमिट रूम बियरबार ज्या जागेवर आहे त्या येथील प्लॉट नंबर 679 / 10 चे अधिकृत मालक सुद्धा राहुल मुंडके असल्याने याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून राहुल मुंडके यांनी अवैध रित्या केलेल्या कमाईची, प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा सर्वस्तरातून मागणी होत आहे.