“लोक विसरुन जातील..” पत्नी साक्षीची भावुक प्रतिक्रिया!
“लोक विसरुन जातील..” पत्नी साक्षीची भावुक प्रतिक्रिया!
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भावुक व्हिडीओ शेअर करत धोनीनं मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं अन् लाखो चाहत्यांना अश्रूंचा बांध फुटला. धोनीच्या निवृत्तीवर पत्नी साक्षीनंही आता भावुक शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
झन्स्टाग्रामवर धोनीच्या निवृत्तीवर साक्षी म्हणाली की, ‘तू जे काही मिळवलं आहेस त्यावर तुला स्वतःचा अभिमान असायला हवा. आवडत्या खेळात तू तुझ्या आयुष्यातला बेस्ट दिलास याबद्धल शुभेच्छा…क्रिकेटला निरोप घेताना तुला अश्रू अनावर झाले असतील याची मला पूर्णत: खात्री आहे. भविष्यासाठी तुला खुप साऱ्या शुभेच्छा..’ लोक विसरुन जातील तुम्ही काय म्हणालात, लोक विसरून जातील तुम्ही काय मिळवलं. मात्र तुम्ही लोकांना कसं अनुभवायला भाग पाडलं हे लोक कधीच विसरू शकणार नाहीत, या अमेरिकेतील प्रसिद्ध कवी माया एंजलो यांच्या ओळीदेखील खास धोनीसाठी तीने शेअर केल्या आहेत.
दरम्यान दरम्यान 2008 मध्ये महेंद्र सिंग धोनीला कसोटी टीमचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्यानंतर 30 डिसेंबर 2014 रोजी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. आता 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.