मंडप व्यावसाय व साऊंड सिस्टीम व्यावसाय अडचणीत

Featured धुळे
Share This:

मंडप व साऊंड सिस्टीम व्यावसायिकांच्या भावना शासनापर्यंत नक्कीच पोहाचवणार : हेमंत साळुंके

शिंदखेडा: तालुक्यातील मंडप व्यावसायिकांचे व्यवसाय लॉकडाऊन व कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आले आहे. 21 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित केल्यामुळे चालू वर्षाचे सर्व लग्न समारंभ रद्द करण्यात आलेले आहे. यामुळे मंडप व्यावसाय व साऊंड सिस्टीम व्यावसाय अडचणीत सापडला असून शासनाने आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी मंडप व साऊंड सिस्टीम व्यावसायिक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्यांची अवस्था खरोखरच बिकट झालेली आहे. यासंदर्भात त्यांच्या भावना व त्यांची मागणी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू असे आश्वासन श्री.साळुंके यांनी संबंधितांना दिले.

लॉकडाऊन उठविल्यानंतरही शासन लग्नसमारंभांना परवानगी देणार नाही. यामुळे मंडप व्यावसायिक व साऊंड सिस्टीम व्यावसयिक अडचणीत सापडले असून विवाह समारंभाच्या आर्डर रद्द झाल्यामुळे वर्षभराच्या उत्पन्न त्यांना मिळू शकलेले नाही. एका मंडप व्यावसायिकासोबत प्रत्येकी 10 मजुर रोजंदारीने काम करतात. तर साऊंड सिस्टीम व्यवसायात 1 व्यक्ती रोजंदारीने काम करतात. लग्न सोहळे यासह सभा, संमेलने व धार्मिक कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांनाही मजुरी मिळू शकलेली नाही. त्यातच मंडप व साऊंड सिस्टीम व्यावसायिकांनी घेतलेले कर्जाचे हप्ते थकीत होत आहेत. ग्राहकांनी दिलेल्या आगाऊ रक्कम मंडप व्यावसायाचे सेट खरेदी करण्यासाठी गुंतविल्याने ग्राहकांना आगाऊ रक्कम परत करण्यासाठी सुध्दा पैसे नाहीत.

साऊंड सिस्टिम व्यवसायावर अनेक गरीब कुटूंबातील तरुणांचे रोजगार अवलंबून आहे. बहुतांश व्यावसायिकांनी बँकेचे कर्ज व खाजगी कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केलेला आहे. त्यामुळे मंडप व साऊंड सिस्टीम व्यावसायिक व त्यांच्या सोबत काम करणारे मजुर यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करुन आर्थिक सहाय्य करावे व कर्जाचे हप्ते भरण्याची मुदतवाढ देण्यात यावी. यासह मंडप व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना कराव्यात, असेही निवेदनात नमुद केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *