
पाण्यासाठी एम आय एम नगरसेवकाचे देवपूरातील नवरंग जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन
पाण्यासाठी एम आय एम नगरसेवकाचे देवपूरातील नवरंग जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन.प्रश्न मार्गी न लागल्यास उडी मारण्याची दिली धमकी !
धुळे (तेजसमचार प्रतिनिधि):प्रभाग 2 ला पिण्याचे पाणी मिळावे याकरता दिड दोन तासापासून जिर्ण झालेल्या 70/80 फुट उंच असलेल्या नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल एम आय एम नगर सेवकांचे आंदोलन.
उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाणी प्रश्न तापला एम आय एम पक्षाचे प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेवक साईट बेग यांचे नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल पाण्यासाठी आंदोलन
धुळ्यात यंदाही सालाबादाप्रमाणे पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे काही भागांमध्ये दिवसा सोडलेले पाणी बारा बारा तास चालते तर काही भागांमध्ये आठ ते पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही याकरता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती त्यानंतर माजी पर्यटनमंत्री रावल यांच्या उपस्थितीत गुलमोहर विश्रामगृहात बैठक घेण्यात आली त्यावेळी सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी पाणीप्रश्न अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते परंतु अधिकारी यांनी सगळ्यांचे आदेशाला केराची टोपली दाखवली.
शहरातील पाणी वाटप व्यवस्थेचे नियोजन सत्तास्थापने नंतरही होऊ शकलेले नाही. नियोजन हे ढिसाळ आहे. शहरात पाणीप्रश्नी आज सकाळीकाही संतप्त नागरिक देवपुरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवक सईद बेग यांच्या घरी पाणी मिळत नाही या प्रश्नी विचारणा करण्यासाठी गेले व नगरसेवकांना घेराव केला यानंतर संतप्त नगरसेवक व नागरिक हे देवपूरातील पाण्याच्यासाठी नवरंग पाणी टाकी परिसरात आले तिथे पाणी का सोडले नाही अशी विचारणा केली असता 48 तासापासून वीजपुरवठा नाही त्यामुळे पाणी टाकीत आलेच नाही आणि कुठून सोडणार असं उत्तर दिले यानंतर संतप्त नगरसेवक यांनी जीर्ण झालेल्या पायऱ्यांवरून चढून थेट पाण्याची टाकी उंची 70 फूट असलेल्या भागावर ती जाऊन उभे राहून पाणी जर नागरिकांना मिळाले नाही तर मी इथून उडी मारेल असा पवित्रा घेतला आणि गेल्या दीड ते दोन तासापासून पाण्याच्या टाकीवर ठाण मांडून बसलेले आहे.
या अगोदरही माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी हि अशाच प्रकारे बडगुजर प्लॉट परिसरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते त्यानंतर देवपुरातील वलवाडी परिसरातील पाण्याची टाकी वरती सुद्धा अशाच प्रकारे नागरिकांनी पाणी प्रश्न सोडून पाणी मिळत नाही याकरिता आंदोलन केले होते.
शहरात 25 दिवस पाणी आले नव्हते तरी सुद्धा धुळेकर नागरिकांनी कुठलाच तीव्र असा पवित्रा घेतला नव्हता. आमदार अनिल गोटे यांनी त्यावेळी पाणी प्रश्न मार्गी लावला होता व धुळेकर नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिलं होतं.
अधिकाऱ्यांना कुठल्या हि परिस्थितीचे गांभीर्य नाही कोणी च घटनास्थळी पोहचलेले नाही मनपा यंत्रणा एकदम बेफिकर अशीच झालेली आहे. नागरिकांना वाऱ्यावरच सोडलेले आहे. पाण्याच्या टाकीच्या परिसरात संतप्त नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.