
चाळीसगाव: भीषण पाणी टंचाई असलेल्या भागात नागरिकांना पाणी टँकरमुळे दिलासा
चाळीसगाव: भीषण पाणी टंचाई असलेल्या भागात नागरिकांना पाणी टँकरमुळे दिलासा
चाळीसगाव- मौजे टाकळी प्रचा येथे ऐन उन्हाळ्यात मागील 20 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कोरोनामुळे लॉकडाऊन असतांनाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वण-वण करत भटकावे लागत असून अश्या संकटकाळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष भावेश कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो तर्फे टाकळी प्रचा येथील विविध भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
याकरिता सचिन सूर्यवंशी, मुन्ना तांबे, धनंजय गांगुर्डे, रवींद्र जोशी, मनोज चौधरी, मछिंद्र आभाळे, छोटू एरंडे, ललित महाजन, राहुल माळी, रोहन पाटील, सोनू पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. सदर सेवा ही अविरत चालू ठेवणार असून नागरिकांनी घराच्या बाहे पडू नये असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष भावेश कोठावदे यांनी केले आहे. अशा गंभीर परिस्थितीत युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांचा हा उपक्रम नागरिकांना दिलासा देणारा आहे.