
पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन
पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन
मुंबई (तेज समाचार डेस्क): विख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज (९०) यांचे अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अमेरिकेत रहात होते. याबद्दल अजून सविस्तर माहिती आली नाही. जसराज ४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मोठे बंधू पंडित मणिराम यांनी त्याचे पालन केले. त्यांच्या शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय स्वरांचा अल्बम आणि फिल्म साउंडट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यांनी भारताशिवाय कॅनडा आणि अमेरिकेतही संगीत शिकवले. ११ नोव्हेंबर २००६ ला शोधण्यात आलेल्या २००६ व्हीपी ३२ ला ग्रहाला अंतरराष्ट्रीय खगोलीयसंघाने पसंडीतजींच्या सन्मानात ‘पंडितजसराज’ नाव दिले आहे.