ग्रामीण भागातील दयनीय अवस्थेच्या रस्त्यावर पंचायत राज समितीचे वाहन अडकले

Featured जळगाव
Share This:

पंचायत राज समितीकडून यावल तालुक्यात जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केंद्राची पाहणी.

ग्रामीण भागातील दयनीय अवस्थेच्या रस्त्यावर पंचायत राज समितीचे वाहन अडकले.

यावल पंचायत समिती प्रसिद्धीमाध्यमांपासून चार हात लांब.

यावल (सुरेश पाटील): आज दि.28 मंगळवार रोजी सकाळी11 वाजेच्या सुमारास पंचायत राज समिती जळगावहुन विदगाव मार्गे यावल येत असताना रस्त्यात थांबुन डांभुर्णी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली तसेच इयत्ता चौथी नंतर पाचवीचा वर्ग का सुरू केला नाही याचा संबंधितांना जाब विचारला तसेच डांभुर्णी जिल्हा परिषद शाळे जवळ रस्त्यावरील माटीयुक्त गाऱ्यामध्ये/किचडात पंचायत राज समितीचे वाहन अडकल्याने तसेच पंचायत राज समितीचेच दुसरे एक वाहन संरक्षण भिंतीवर आदळल्याने ग्रामीण भागात शासनाचा,यावल पंचायत समिती अधिकारी,बांधकाम कनिष्ठ शाखा अभियंता,कर्मचारी ग्रामसेवकांचा कसा भोंगळ कारभार सुरू आहे हे पंचायतराज समितीच्या प्रत्यक्षात लक्षात येऊन अनुभव आला यामुळे एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे या ठिकाणी डांभुर्णी ग्रामपंचायत सरपंच उपस्थित नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी ग्रामसेवक यांचे ग्रामीण भागाकडे किती लक्ष आहे हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यानंतर पंचायत राज समिती किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे दहा कोटी रुपये खर्चाचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम जे सुरू आहे त्याची पाहणी केली ते बांधकाम खरोखरच मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे सुरू आहे किंवा नाही याची चौकशी तपासणी पंचायत राज समिती करणारच आहे.
त्यानंतर पंचायत राज समितीने यावल पंचायत समिती कार्यालय गाठून इतर सर्व कामांचा आढावा घेऊन चौकशी केली यावल तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेली बांधकामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने ही बांधकामे काही लोकप्रतिनिधीचे काही नवीन होतकरू ठेकेदार दुसऱ्या ठेकेदारांच्या नावावर प्रत्यक्ष काम करीत आहेत यात ज्यांना बांधकामाचा अनुभव नाही असे काही शिक्षक लोकप्रतिनिधी काही पदाधिकारी काही कार्यकर्ते पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी वर्गाशी संगणमत करून टक्केवारी वाटप करून सोयीप्रमाणे मर्जीनुसार निकृष्ट प्रतीची कामे करीत आहेत. यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व संबंधित अधिकारी यावल पंचायत समिती कार्यालयात किंवा तालुक्यात विविध योजनांच्या कामांबाबत प्रसिद्धीमाध्यमांना कोणतीही माहिती देत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विकास कामांची माहिती मिळत नसल्याने प्रसिद्धी माध्यमांमध्ये तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे याकडे सुद्धा पंचायत राज समितीने आपले लक्ष केंद्रित करून चौकशी करून कार्यवाही करावी असे सर्व स्तरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *