पी.एम. केअर मधून जळगाव जिल्ह्यात एकूण 80 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत ?

Featured जळगाव
Share This:

पी.एम. केअर मधून जळगाव जिल्ह्यात एकूण 80 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत ?

यावल ( सुरेश पाटील ): कोविड–19 च्या अनुषंगाने पीएम केअर मधून जळगाव जिल्ह्यासाठी एकूण 80 व्हेंटिलेटर्स आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड–19 जळगांव यांचे कडील दिनांक 3 ऑगस्ट 2020 चे पत्रावरून स्पष्ट दिसून येत आहे.
महाराष्ट्र शासन जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव. जिल्हा पेठ जळगाव. कार्यालयातील जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड–19 यांनी दिनांक 3 8 2020 रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी ग्रामीण यांना उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक यांचे पत्रान्वये आणि कोविड–19 च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर विषयान्वये लेखी पत्र देऊन वाहनचालक सुभाष सोनवणे जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांनी सदर वेंटिलेटर चे वाटप करावे व तसेच संबंधितांकडून पोहोच घ्यावी असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते.

जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय चोपडा, उपजिल्हा रुग्णालय जामनेर, उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर यांना प्रत्येकी 10 , ग्रामीण रुग्णालय अमळनेर, ग्रामीण रुग्णालय पाचोरा, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, ग्रामीण रुग्णालय भुसावल यांना प्रत्येकी 5 , ग्रामीण रुग्णालय रावेर 4 , ग्रामीण रुग्णालय धरणगाव, ग्रामीण रुग्णालय एरंडोल, ग्रामीण रुग्णालय पारोळा, ग्रामीण रुग्णालय भडगाव यांना प्रत्येकी 3 , ग्रामीण रुग्णालय वरणगांव, ग्रामीण रुग्णालय न्हावी, ग्रामीण रुग्णालय पहुर, ग्रामीण रुग्णालय बोदवड, ग्रामीण रुग्णालय यावल, यांना प्रत्येकी 2 , ग्रामीण रुग्णालय पाल, ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव, ग्रामीण रुग्णालय सावदा, ग्रामीण रुग्णालय न्हावी यांना प्रत्येकी 1 असे एकूण 80 वेंटिलेटर आपल्या जळगाव जिल्ह्यात देण्यात आले आहेत, जिल्ह्यातील या 21 ठिकाणी दिलेल्या 80 व्हेंटिलेटर चा लाभ किती कोरोनाग्रस्त रुग्णांना मिळाला याची प्रसिद्धी जनतेच्या माहितीसाठी संबंधित ग्रामीण रुग्णालयांनी करायला पाहिजे होती आणि आहे याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी जळगाव डॉ.अभिजीत राऊत यांनी ज्या ज्या ठिकाणी व्हेंटिलेटर आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कोरोनाग्रस्त रुग्णांना व्हेंटिलेटर चा लाभ जास्तीत जास्त कसा देता येईल याबाबत कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *