भागपूर रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची वर्दळ

Featured जळगाव
Share This:

भागपूर रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची वर्दळ.

भागपूर उपसा सिंचन ठेकेदाराची मनमानी.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील):तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव पासुन15ते17किलोमीटर आणि नशिराबाद पासून5किलोमीटर अंतरावर असलेल्या भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम सुरू असल्याने भागपूर रस्त्यावर संबंधित ठेकेदार क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची म्हणजे वाळू,माती,डबर,गिट्टी इत्यादी साहित्याची सर्रास वाहतूक करीत असल्याची तक्रार नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी केली आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक यांच्याकडे दि.7मे2021 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नशिराबाद येथील माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या संदर्भानुसार म्हटले आहे की,8फेब्रुवारी2021पासून संबंधित अधिकाऱ्याना प्रत्यक्ष भेटून आणि लेखी तक्रार करून कळविले आहे.
तसेच आपल्या आधिपत्याखाली कार्यकारी अभियंता उपसासिंचन बांधकाम विभाग अंतर्गत भागपुर उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे या कार्यालयाशी संबंधित ठेकेदार हे अवजड वाहनाने जास्त लोडक्षमतेने मटेरियलची वाहतूक करीत आहे शासन नियमाप्रमाणे जास्त लोड क्षमतेने वाहतूक करू शकत नाहीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी कार्यालयात प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहाराने आणि तोंडी स्वरूपात चर्चा झालेली आहे तरी पण जास्त लोड क्षमतेने दिवस-रात्री वाहतूक सुरु आहे.
वाघूर डावा कालवा त्यावरील बांधकाम याची लोडक्षमता संबंधित ठेकेदार करीत असलेल्या लोड क्षमतेपेक्षा कमी आहे याबाबत संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे याचाच अर्थ काहीतरी देवाणघेवाण झाल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे तरी याची सविस्तर चौकशी व्हावी,सध्या संबंधित ठेकेदार हा जास्त लोड क्षमतेचे टिप्पर,व्हायवा(10चाकी) हे मायनर क्र.3 वाघूर डावा कालवा बेळी ब्रिज ग्रामीण रस्ता यांचेकडून बिना ताडपत्रीने वाहतूक करीत आहेत. ग्रामीण रस्ते हे आधीच10ते15 वर्ष होत नाही त्यातच ठेकेदाराचे जास्त लोड क्षमतेचे ट्रॅक्स डंपर वाहतूक करीत आहेत त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.संबंधित ग्रामपंचायतीची अथवा जिल्हा परिषद जळगाव यांच्या कडून जास्त लोड क्षमता वाहतुकीची परवानगी घेतलेली नाही यात संबंधितांचे संगनमत झालेले आहे का?ग्रामीण रस्त्यावर शासन नियमाप्रमाणे10चाकी वाहनांची परवानगी नाही.
रात्रीच्या वाहतुकीमुळे वन्य प्राणी हे निमगाव,बेळी,जळगाव खुर्द, सुनसगांव,बेलव्हाय,नशिराबाद इत्यादी मानव वस्तीकडे येत असतात वन्य प्राण्यांकडून मानवी नुकसान झाल्यास संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील तसेच माझे जिवाचे कमी-जास्त झाल्यास बांधकाम विभाग जळगाव व सहाय्यक अभियंता श्रेणी-1 संकल्पचित्र उपविभाग क्र.3जळगाव हे पूर्णपणे जबाबदार राहतील तक्रार अर्जानुसार प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी चौकशी न झाल्यास लॉकडाऊन संपल्यानंतर नाईलाजास्तव जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसावे लागेल असे दिलेल्या तक्रार अर्जात नितीन रंधे यांनी म्हटले असून तक्रार अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे माहिती म्हणून दिल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *