
धुळे : आयएम हॉल मध्ये आयकर विभागाचा ‘आऊटरीच प्रोग्राम’
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) धुळे येथे आय एम हॉल मध्ये आयकर विभागाच्या वतीने ‘आऊटरीच प्रोग्राम’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन आयकर विभागाचे उपायुक्त अजय सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लाख सव्वा लाखापर्यंतच करदाते आहे. ही बाब योग्य आहे.? कर हा प्रत्येक कर दात्याने दिला पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आता कर चुकवणाऱ्यांना सहज शोधता येणेही शक्य झाले आहे.त्यांचे दैनंदिन बँकेचे व्यवहार त्यातील होणारा व्यवहार जमा व खर्चिक रक्कम यातील कर दिला आहे. की नाही हे लक्षात येते काही करदात्यांनी कर दिलेला आहे. कि नाही ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करुन कर न देणाऱ्या नागरिकांवर हि कारवाई होणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी योग्य ती कागदपत्रे भरून कराची पूर्तता करावी. कारवाई टाळावी असे आव्हान आयकर उपयुक्त अजय सिंग यांनी केले. यावेळी आयकर अधिकारी पी एस वसावे,आयकर अधिकारी उदय कुलकर्णी, आयकर अधिकारी चेतराम मीणा,डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी, शिवकुमार डोंगरे,उद्योजक नितीन बंग, निलेश अग्रवाल हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन उदय कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमासाठी चार्टर्ड अकाऊंटंटस, कर सल्लागार,व्यापारी तसेच पगारदार मंडळी आयकरदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
