जागतिक हात धुवा दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन 

Featured नंदुरबार
Share This:

 जागतिक हात धुवा दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : राज्यभरात जागतिक हात धुवा दिवस निमित्त ‘हाताची स्वच्छता सर्वांसाठी’ या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीस (सी.वाय.डी.ए.) आणि युनायटेड नेशन चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत ,सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीस (सी.वाय.डी.ए.) आणि युनायटेड नेशन चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) प्रत्यक्षपणे व इतर जिल्ह्यांत अप्रत्यक्षपणे मागील वर्षभरापासून वॉश (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) या घटकांवर संबंधित जिल्ह्यांतील शिक्षण विभागासोबत कार्य करीत आहेत.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून १५ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या ‘जागतिक हात धुणे दिवस’ ह्या दिनाचे औचित्य साधून हाथ धुणे अभियान राबवण्यात येत आहे. हि मोहीम ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. या मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त मुलांना हात धुण्याचे महत्व कळावे, त्याच प्रमाणे मुलांच्या माध्यमातून समाजामध्ये हात धुण्याच्या सवयींबाबत जनजागृती व्हावी हा आहे. हात धुणे दिनाची संकल्पना “हाताची स्वच्छता सर्वांसाठी ” ही असून, या अभियानाअंतर्गत शालेय विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.11/10/2020रोजी हात धुण्याबाबत जनजागृती करणारा स्वतः तयार केलेला २ मी. चा व्हिडीओ तयार करणे. दि.12/10/2020रोजी हात कधी कधी धुवावेत याचे महत्व सांगणारे पोस्टर/चित्र काढणे. दि.13/10/2020 रोजी टाकाऊ किंवा आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून हात धुण्याचे ठिकाण तयार करणे व त्याचा फोटो काढणे. दि.14/10/2020रोजी हात धुण्याचे महत्व सांगणारा २ मी. व्हिडीओ करणे व सायंकाळी 4.00 ते 6.00 सहभागी विध्यार्थ्यांसोबत zoom app च्या माध्यमातून चर्चा.
Meeting ID-840 5620 9314 Passcode – 088037

दि.15/10/2020रोजी zoom app च्या माध्यमातून विजेत्यांना बक्षिस वितरण.
Meeting ID-840 9436 2409 Passcode – 369077
सदर स्पर्धा 4 थी ते 10 वी विध्यार्थ्यांसाठी राहील.सहभाग नोंदवण्यासाठी www.cydaindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *