यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे सरसकट पंचनामे करणेची मागणी

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे सरसकट पंचनामे करणेची मागणी

यावल तहसीलदार यांना शेतकरी आणि लोकप्रतिनिधी कडून निवेदन

यावल (सुरेश पाटील): तालुक्यात सर्व भागात सततधार पावसाने आणि शेती शिवारांमध्ये पाणी साचुन राहील्याने शेतातील खरीपाच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.म्हणून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही होणेबाबत यावल येथील व परिसरातील शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले.
दि. 28 सप्टेंबर 2020 सोमवार रोजी यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यात जवळजवळ सर्व भागांत सतत धार पावसामुळे तसेच शेती शिवारात पाणी साचून राहिल्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकाचे 100%टक्के नुकसान झाले. नूकसानाचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत या पिकांचे सरसकट पंचनामे करून सदर नूकसानाची भरपाई शासनाने जाहीर केल्यास शेतकऱ्याला जगण्यापूरता पैसा उपलब्ध होईल तरी नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षापासून शेतकरी अडचणीत आला असून त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नूकसान भरपाईची मागणी करणे आवश्यक आहे तरी खरीपातले ज्वारी काळी पडली पडून त्यावर बुरशी आलेली आहे.कापसाचे बोंड लाल पडले आहेत, कापसामध्ये पाऊस पाण्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव दिसत आहे. भुईमुंगाच्या शेंगा बनण्याअगोदच सडून गेल्या आहेत,सोयाबीनच्या पिकावर शेंगांचे प्रमाण अतिशय कमी व दाणा तयार होण्याची प्रक्रिया बंद झाली आहे.अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्याला या पिकांतून कुठलेही उत्पन्न मिळणार नसल्याने याची नूकसान भरपाई मिळण्यासाठी आपण आपल्या शासनस्तरावरुन सर्कल,तलाठी,कृषी अधिकारी,कर्मचारी इत्यादी माध्यमातून सरसकट पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणेसाठी कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदनावर यावल येथील नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा शेतकरी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे,लीलाधर काटे, स्नेहल फिरके,रितेश बारी, भूषण जगन्नाथ फेगडे,निर्मल नथू चोपडे,पंकज जगन्नाथ महाजन,दिगंबर रमेश खडसे, वैभव प्रमोद चौधरी, गोपालसिंह पाटील,सुनील श्रीधर पाटील इत्यादी शेतकरी,पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *