पुण्यात मिळणार फक्त दूध, बाकी सर्व बंद

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क). संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची स्थिति फारच गंभीर आहे. विशेष रूपाने मुंबई आणि पुणे येथे रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. पुण्यात वाढत असलेल्या रुग्ण संख्येला आटोक्यात आण्ाण्या करीता आता कडकडीत लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे. कोरोना बाधित क्षेत्र असलेल्या दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बुधवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्याच आले आहेत. या ठिकाणी फक्त सकाळी दहा ते बारा या वेळेत दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

– 24 एप्रिल पर्यंत आदेश लागू
पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंगळवारी रात्री हे आदेश काढले. दुधाच्या वाहतुकीवर बंधन राहणार नाही. मात्र, घरी जाऊन दूध वितरणावर बंधन राहणार आहे. २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील.

– या 10 पोलीस ठाण्याच्या हद्दित मिळणार फक्त दूध
* समर्थ पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग
* खडक पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग
* फरासखाना पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग
* स्वारगेट पोलीस ठाणे- गुलटेकडी, महर्षीनगर, डायस प्लॉट
* बंडगार्डन पोलीस ठाणे- ताडीवाला रोड
* दत्तवाडी पोलीस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
* येरवडा पोलीस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ
* खडकी पोलीस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
* कोंढवा पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग
* वानवडी पोलीस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ व २८

– नागरिकांमध्ये गांभीर्य नाही
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काही नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही. येरवडा येथील भाजी मंडईतही नागरिकांनी मोठ्या प्रमाण गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आले नव्हते. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमानात कोरोना बाधित रुग्णही आढळले असून नागरिकांना त्याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *