मध्य प्रदेश: भूमिपुत्रांनाच मिळणार सरकारी नोकरी – शिवराज सिंह चौहान

Featured देश
Share This:

मध्य प्रदेश: भूमिपुत्रांनाच मिळणार सरकारी नोकरी – शिवराज सिंह चौहान

 

भोपाळ (तेज समाचार डेस्क) : मध्य प्रदेशात आता केवळ भूमिपुत्रांनाच सरकारी नोकरी मिळेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज (१८ ऑगस्ट) ला ही घोषणा केली. यासाठी कायदेशीर पावलं उचलली जातील असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.

शिवराज सिंह चौहान यांनी एक व्हिडीओ व्हायरल  करून ही माहिती दिली. ते म्हणाले की, यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील. मध्य प्रदेशातील साधनसामुग्री केवळ राज्यातील मुलांसाठीच असेल.

आतापर्यंत मध्य प्रदेशासाठी सरकारी नोकरभरतीसाठी देशपातळीवर अर्ज मागवले जात होते. नुकतेच एका नोकरभरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागवले होते. मध्य प्रदेशातील तरुणांनी याचा तीव्र विरोध केला होता.

याआधी कमलनाथ सरकारने उद्योगांमध्ये स्थानिकांना ७० टक्के रोजगार देने अनिवार्य केले होते. कमलनाथ सरकारच्या नियमानुसार, मध्य प्रदेशातील ७० टक्के स्थानिकांना रोजगार दिला तरच सरकारी योजनांमध्ये उद्योजकांना करामध्ये सूट मिळणार आहे.

पोटनिवडणुकीवर नजर

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. मात्र इतर राज्यांमधून जे लोक मध्य प्रदेशात राहून काम करत आहेत, त्यांच्यासाठी कोणते नियम असतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. नवीन नियम कधी लागू होणार याची घोषणा अजून झालेली नाही. यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. आतापर्यंत एमपीपीएससी आणि इतर नोकऱ्यांमध्ये देशभरातून अर्ज येत होते. सगळ्यांसाठी नियम समान होता. परंतु या नव्या नियमामुळे आता केवळ मध्य प्रदेशातील नागरिकांनाच सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *