पंकज प्राथमिक विद्यालयाचा ऑनलाईन निकालाचे ऑनलाईन – व्हाट्सएपद्वारे वाटप

Featured जळगाव
Share This:

चोपडा ( विश्वास वाडे ) : येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित , पंकज प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी या वर्गांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आला .

विद्यालयातील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा संगणीकृत निकाल तयार करून त्यात गुणनोंदवही , वर्णनात्मक नोंदवही ,प्रगती पत्रक , श्रेणी तक्ता , विवरण तक्ता , संचयी नोंदपत्रक इत्यादी अभिलेखे तयार करण्यात आले आहेत .

शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पने अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले गेले व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रतिसाद देखील दिला .त्या धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासास प्रतिसाद दिला त्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करून त्याचे शंभर गुणात रूपांतर करून निकाल पत्रक तयार करण्यात आले आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासास काहीच प्रतिसाद दिला नाही अशा विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर आर टी ई ऍक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा उल्लेख करण्यात येऊन प्रगती पत्रक तयार करण्यात आले आहेत .पंकज प्राथमिक विद्यालयाने विद्यालयाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करून दिला आहे तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून पालकांना वैयक्तिक निकालपत्रक देखील पाठविण्यात आले आहेत.

कोविड १९ या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नती देण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांनी आठ एप्रिल रोजी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत .

कोविड १९ च्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करता आल्या नाहीत , त्यामुळे इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व गुरुजींचे दर्शन सुद्धा झाले नाही तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्गात अध्यापन काही काळ शक्य झाले . शाळा बंद पण विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शाळा स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व व्हाट्सएपच्या माध्यमातून दिलेल्या शिक्षणास प्रतिसाद दिला नाही त्या विद्यार्थ्यांच्या प्रगती कार्डवर आर टी ई ऍक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा उल्लेख करण्यात आला आहे .

ज्या विद्यार्थ्यांची आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक पी आर ई / २०१० /(१३६ /१० ) २० ऑगस्ट २०१० च्या जीआर नुसार पदोन्नती देण्यात आली आहे . ज्या विद्यार्थ्यांचे फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनातील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात आली आहे .ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले नसेल त्यांनी शासन पत्र दिनांक सहा एप्रिल २०२१ नुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा उल्लेख करण्यात आला आहे .

पालकांनी ऑनलाईन शिक्षणाचे व ऑनलाईन निकालाचे स्वागत केले असून शिक्षकांना व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेक बोलक्या प्रतिक्रिया पाठविल्या आहेत .

पालक प्रतिक्रिया
आज माझी कन्या श्रावणी हिचा निकाल पाहून खूप समाधान वाटले . मागील वर्षापासून कोरोनाचे संकट असतानासुद्धा वर्ग शिक्षिका गायत्री शिंदे यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला .सर्व विषयांचे विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले .त्यामुळे विद्यार्थ्यांची वाचनात अतिशय छान सुधारणा झाली. गणितीय संबोध स्पष्ट झाले. बेरीज – वजाबाकीची उदाहरणे व्यवस्थित सोडवू लागली .खेळू करू शिकू या विषयांतर्गत येणाऱ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंद मिळाला तसेच ऑनलाइन टेस्ट सोडवून घेतल्या. सांस्कृतिक सुद्धा ऑनलाईन व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला. वर्गशिक्षिका गायत्री शिंदे यांनी वर्षभर मेहनत घेतली त्यामुळे विद्यार्थी चांगली प्रगती करून भविष्यात निश्चितच चांगले यश संपादन करतील.

संस्था प्रमुख , मुख्याध्यापक व सर्वच शिक्षकांनी कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी परिपूर्ण मेहनत घेऊन विद्यार्थी विकास साधण्याच्या निश्चितच प्रयत्न केला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *