
पतंजली योग समितीतर्फे ऑनलाइन सहयोग शिबिर
पतंजली योग समितीतर्फे ऑनलाइन सहयोग शिबिर
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : योगगुरु रामदेव बाबा प्रेरीत पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व आणि पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून 25 दिवसीय ऑनलाईन सहयोग शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या समारोपानंतर सहभागी शिक्षकांना पतंजली परिवारातर्फे सहयोग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिनांक 5 ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन शिबिरात योगासन, प्राणायाम, आयुर्वेदाचे थेरी व प्रात्यक्षिक तज्ञ शिक्षकांकडून शिकविण्यात येईल. सर्व रोगानुसार योगाभ्यास शिकवून रोगमुक्त केले जाईल. दररोज सकाळी 5 ते 7 आणि सायंकाळी 5 ते 6 असे पंचवीस दिवस सत्र होणार आहे. यात परिपूर्ण योग शिक्षक बनण्याची संधी असून इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार पतंजली परिवारातर्फे करण्यात आले आहे.