
शिरपूर ब्रेकिंग : मध्यप्रदेशातून आलेला भाडोत्री निघाला कोरोना पॉजिटिव
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिध). शिरपूर शहराच्या आमोदे परिसरात मध्यप्रदेशातून आलेला एक इसम कोरोना पॉजिटिव आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल यांनी एक आदेश जारी करून सूचित केले आहे कि संपूर्ण शिरपूर शहर, आमोदे, कळमसरे, मांडळ या गावांमध्ये १२ मे २०२० ते २६ मे २०२० या चौदा दिवसांच्या काळात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात येत आहे. १२ मे ते १५ मे या तीन दिवसांच्या काळात शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसापहिले मध्यप्रदेश येथून एक व्यक्ती आमोदे येथे आला होता. त्याची धुळे येथे तपासणी करण्यात आली होती. त्याचा आहवाल आज प्राप्त झाला असुन तो व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो रूग्ण आमोदे येथे भाडेकरू असुन मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. याबाबत प्रशासन दक्ष झाले असुन आमोदे येथे प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तहसीलदार आबा महाजन कर्मचारींसह दाखल झालेत. यापुर्वी दोन पॉझिटीव्ह कोरोना रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.