
करोना विषाणूबाबत सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा
मुंबई (तेज समाचार डेस्क) : चीनमधल्या वुहान शहरातून करोनाच्या महाभयंकर विषाणूच्या प्रसारास सुरूवात झाली, त्याच वुहान शहरासह चीनमध्ये याच विषाणूच्या प्रार्दुभावामुळे एक करोडपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचा खात्रीलायक बातम्या आता चीनमधून हळू हळू बाहेर येऊ लागल्या आहेत.
करोना विषाणू हा जगावर चीनने केलेला बायोलॉजिकल अटॅक असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. चीनचा बायोलॉजिकल अटॅक चीनलाच तापदायक ठरला असून आता संपूर्ण जगही करोना विषाणूने बेजार झाले आहे.
करोनाचा प्रार्दुभाव झाल्यापासून आतापर्यंत चीन आपल्या देशातील कोणतीच माहिती खरी सांगायला तयार नाही, ज्यांनी खरी माहिती जगाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा आवाज कायमस्वरूपी बंद केला गेला. याचेही पुरावे जगासमोर यायला सुरूवात झाली आहे.
चीनमधील मानवाधिकार अॅक्टीविस्ट जेनेफेर जीन या महिलेने चीनच्या हुकुमशाहीवर जोरदार प्रहार केला असून तीने अनेक सत्य बाहेर काढायला सुरूवात केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, वुहानमध्ये करोना बाधितांना जाळण्यासाठी करोना भट्टी तयार करण्यात आली होती. याच करोना भट्टीमध्ये अनेक करोना बाधितांना जिवंत जाळण्यात आल्याचेही जेनीफर जीन यांनी सांगितले आहे.
जाळल्यानंतर चीनच्या प्रशासनाने करोना बाधितांची अस्थी कलशात भरून करोना बाधितांच्या कुटुंबियांना देण्यात आली त्याची संख्या हजारोच्या घरात होती. मात्र मेलेल्या लोकांचे रेकॉर्ड व अस्थी कलश यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. चीनच्या प्रमुख तीन मोबाइल कंपन्यांचे सुमारे २ कोटी लोकांचे क्रमांक गेल्या दोन महिन्यापासून बंदच असल्याचे सत्यही समोर आले आहे