
शिरपूर : कोरोना संक्रमितांमध्ये अजून एका रुग्णाची भर
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). एकेकाळी ग्रीन झोन मध्ये असलेला शिरपूर आज हळू-हळू कोरोनाच्या विळख्यात अडकत जात आहे. आज पुन्हा शिरपूर शहरात एक अजून रुग्णाची भर पडली आहे. शनिवारी शहरातील काझी नगरात रहाणा-या 62 वर्षीय इसमाची कोरोना रिपॉर्ट पॉजिटिव आली आहे. याच सोबत शिरपूरात कोरोना रुग्णांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे कालच भाटपुरा परिसरात 48 वर्षीय एका पुरुषाचा रिपोर्ट पण पॉजिटिव आला होता आणि आज लगेच दूस-या दिवशी एक अजुन रुग्ण मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या अर्थे येथील 4, भाटपुरा येथील 1 व शहरातील 2 असे 7 रुग्ण उपचार घेत आहेत. दो रिपोर्ट अजून आलेले नाही, पण आज पुन्हा 14 लोकांचे स्वैब घेऊन तपासणी पाठविण्यात आले आहे.