धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): धुळे महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभा संपन्न होताच नगरसेविका फातिमा अन्सारी यांनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये पिण्याचे पाणी दहा ते बारा दिवस येत नाही याकरता परिसरातील नागरिक यांच्यासह लेखी निवेदन देण्यात आले. मनपा आयुक्त यांना महिलांनी घेराव घातला.
शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच महानगरपालिकेत नगरसेविकेने आयुक्त व स्थायी समिती सभापती यांना हे निवेदन दिले आहे .आता यंदा तरी उन्हाळ्यात धुळेकर नागरिकांना भटकंती करावी लागू नये हीच इच्छा नगरसेविकेने व्यक्त केली आहे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असते.नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते हे नेहमीच दरवर्षीचे चित्र आहे.हे चित्र बदलले पाहिजे. परंतु कारवाई होत नाही.निवेदन देऊन एक प्रकारे धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या द्वारे करण्यात आलेला आहे.पाण्याची समस्या मार्गी लागावी. पाणी दिवसातून दोन दिवसा आड सोडण्यात यावे. पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागते पाणी समस्यांनी त्रस्त असतात वर्षभर अगोदर हि पाण्याबाबत नियोजन झालेले नाही आणि आताही परत उन्हाळा सुरू झाला. अशा उन्हाळ्यात पुन्हा नागरिकांना वणवण करावी लागू नये ती थांबली पाहिजे या करता प्रभाग क्रमांक च्या नगरसेविका यांनी हे निवेदन देऊन आयुक्तांना सांगितले की पाणी समस्याजर मार्गी लागेली नाही तर यापुढे मनप वर मोठा हंडा मोर्चा काढण्यात येईल मनपा प्रशासन याला जबाबदार असेल नागरिकांच्या पाणीप्रश्न संदर्भातील समस्या त्वरित मार्गी लागावी याकरता लेखी निवेदन देण्यात आले आहे.